नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Political Crisis | शिवसेनेत (Shivsena) पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली. आमदारांच्या अपात्रतेसह शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत (Election Symbol) सुरु असलेल्या वादावर आज कोर्टात सुनावणी (Maharashtra Political Crisis) सुरु आहे. दोन्ही गटांकडून युक्तिवाद सुरु असतानाच ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Advocate Kapil Sibal) यांनी मोठा दावा केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कागदपत्रानुसार उद्धव ठाकरे हेच 2018 ते 2023 या कालावधीपर्यंत शिवसेनेचे अध्यक्ष आहेत. तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांनी स्वेच्छेने पक्ष सदस्यत्व सोडलं आहे, अस सिब्बल यांनी म्हटलं. तसेच एकनाथ शिंदे हे पक्षाचे प्राथमिक सदस्यही नव्हते. ते पक्षाच्या कार्यकारिणीत (Party Executive) निवडून आलेले नव्हते तर नियुक्त केलेले होते, असा युक्तिवाद सिब्बल यांनी करत शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. (Maharashtra Political Crisis)
आम्ही शिवसेना पक्ष सोडला नसून आमची शिवसेनाच मूळ पक्ष आहे, असा दावा करत शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला होता आणि पक्षाचं चिन्ह मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. याबाबत आज कोर्टात शिंदे हे कोणत्या भूमिकेतून निवडणूक आयोगाकडे गेले होते, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर शिदे यांच्याकडून नीरज किशन कौल (Neeraj Kishan Kaul) यांनी उत्तर देताना पक्षाचा सदस्य म्हणून आम्हाला आयोगाकडे जाण्याचा अधिकार असल्याचे म्हटले. त्यानंतर आता कपिल सिब्बल यांनी प्रतिवाद करत शिंदे हे पक्षाचे प्राथमिक सदस्यच नसल्याचा दावा केला आहे.
Web Title: Maharashtra Political Crisis | Shiv Sena president Kapil Sibal claims that Uddhav Thackeray is the only candidate till 2023, according to Election Commission documents.
हे देखील वाचा :
Pune School Bus Accident | पुणे जिल्ह्यातील आंबेगाव मध्ये स्कूल बस दरीत कोसळली, 44 विद्यार्थी जखमी