भोपाळ : बहुजननामा ऑनलाईन – मध्य प्रदेशातील एका कालव्यात बस कोसळली. त्यानंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी बस दुर्घटनेची माहिती घेतली. त्यासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्यामध्ये त्यांनी सांगितले, की बचावकार्य तातडीने सुरु करण्याचे आदेशही त्यांनी दिले. यादरम्यान शिवराजसिंह यांनी परिवहनमंत्री गोविंद सिंह राजपूत यांनाही बोलावले. तसेच त्यांनी मंत्रालयात परिवहनमंत्र्यांशी चर्चा केली.
कालव्यात कोसळलेली ही बस 54 प्रवाशांना घेऊन जात होती. त्यामध्ये 38 प्रवाशांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. MP19P1882 या क्रमांकाची दुर्घटनाग्रस्त बसचे परमिट रद्द करण्यात आले आहे. ही बस जबलानाथ परिहार ट्रॅव्हल्सची होती. बसचे मालक कमलेश्वर सिंह आहेत. परिवहनमंत्री राजपूत यांनी सांगितले, की बसचे परमिट रद्द करून ट्रान्सपोर्ट कमिश्नर यांना या दुर्घटनची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणात जो कोणी दोषी आढळले त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.
मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख
दरम्यान, या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबियांना सरकारकडून 5 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री शिवराजसिंह यांनी केली.
प्रधानमंत्री आवास योजनेचा कार्यक्रम रद्द
मध्य प्रदेशात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत होणाऱ्या गृहप्रवशेम कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार होते. मंगळवारी वसंतपंचमीच्या निमित्ताने प्रधानमंत्री आवास योजनेच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह पोहोचले होते. मात्र, त्यांनी हा कार्यक्रम स्थगित केला जात असल्याचे सांगितले.