बहुजननामा ऑनलाईन – गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे अनेकांना आपली नोकरी, रोजगार गमवावा लागला. लॉकडाऊनचा फटका बसललेल्या बंगळुरूमधील एका तरुणाला त्यानंतर नाईलाजाने जिगोलो व्हावे लागले आहे. परंतु काही दिवसांनी याबाबत पत्नीला समजताच तिने घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. आपला पती जिगोलो बनल्याचे त्याने ही बाब आपल्यापासून लपवून ठेवल्याचे म्हटले आहे. बंगळुरु पोलीस आणि महिला हेल्पलाईन दोघांतील मतभेद मिटवण्यासाठी अनेकदा काऊंन्सिलिंग केले. परंतू त्यानंतरही हे दांपत्य एकत्र राहू इच्छित नसल्याचे समोर आले आहे.
TOI च्या वृत्तानुसार, 2017 मध्ये या दोघांची भेट एका कॉलसेंटरच्या कॅन्टीनमध्ये झाली होती. त्यानंतर 2019 मध्ये दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. दोघांनी बंगळुरूमध्ये एका ठिकाणी भाड्याने घर घेतले. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन झाला. यामुळे तिच्या पतीची नोकरी गेली. दरम्यान काही महिन्यांनी आपला पती आपल्यापासून काहीतरी लपवत असल्याचे जाणवले. तासनतास तो लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये व्यस्त होता. इतकंच नाही तर अनेकदा तो वेळी अवेळी घराबाहेरही जात होता, असे महिलेने सांगितले आहे. त्याच्यावर संशय बळावल्याने महिलेने आपल्या भावाच्या मदतीने त्याचा लॅपटॉप उघडला. त्यात तिला एक सिक्रेट फोल्डर सापडला. यात पतीचे काही आक्षेपार्ह फोटो आढळले, तसेच तो जिगोलो असून तासासाठी 3 ते 5 हजार रुपये आकारत असल्याची माहिती तिला मिळाली. दरम्यान, महिलेच्या पतीने या गोष्टी कबूल केल्याची माहिती काऊन्सिलरने दिली आहे.