नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIVE Match | एक बेसबॉल मॅच 9 इनिंगची असते. अमेरिकेत शनिवारी खेळवण्यात आलेली ही मॅच सहाव्या इनिंगमध्ये असतानाच फायरिंग (gun shooting) सुरू झाली. गोळ्यांचा आवाज स्टेडियमच्या (stadium) बाहेरून येत होता परंतु त्याचा परिणाम मैदानाच्या आत दिसत होता. घाबरलेले खेळाडू मैदान सोडून पळताना दिसले तेव्हा प्रेक्षकांमध्ये प्रचंड भीती दिसून आली.(LIVE Match)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
You can hear the gunshots just as the broadcast cuts away pic.twitter.com/tBmbZaR3GB
— Jack Leonardi (@JackLeonardi) July 18, 2021
घाबरलेल्या प्रेक्षकांना दुसर्या दाराने काढले बाहेर
पोलिसांनी रात्री उशीरा पत्रकार परिषदेत सांगितले की, दोन गाड्यांवर बसून आलेल्या लोकांमध्ये आपसात फायरिंग (Firing) झाली. तत्पूर्वी वॉशिंग्टन नॅशनल्सकडून सुद्धा घटनेला दुजोरा देण्यात आला. गोळ्यांचा आवाज आल्याने प्रेक्षक प्रचंड घाबरले होते. प्रथम त्यांना स्टेडियममध्ये बसण्यास सांगण्यात आले. परंतु नंतर स्टेडियमचे दोन मार्ग सेंटरफील्ड गेट (Centerfield Gate) आणि राईटफील्ड गेटने (Rightfield Gate) बाहेर काण्यात आले.
https://twitter.com/alexsalvinews/status/1416574135178862601
1 महिलेसह 3 लोक जखमी
गोळीबारात दोन लोक जखमी झाले. तिसरी महिला ही सामना पहायला आली होती ती सुद्धा जखमी झाल्याचे
नंतर सांगण्यात आले. ही महिला काही कामानिमित्त स्टेडियमच्या बाहेर गेली होती. पोलिसांनी सांगितले या
महिलेला सुद्धा गोळी लागली. पोलिसांनी दोन गाड्यांपैकी एक जप्त केली आहे. तर दुसरीचा शोध सुरू आहे.
आता हा सामना रविवारी होणार आहे.
https://twitter.com/JustinBeland/status/1416573729014943750
Web Titel :- live match gun shooting outside the stadium during washington nationals game fans told to leave 3 people were injured
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 364 नवीन रुग्ण