यवतमाळ : बहुजननामा ऑनलाइन – बसव क्लब, वीरशैव हितसंवर्धक मंडळ, वसुधा प्रतिष्ठान आणि महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने लिंगायत महोत्सव महात्मा बसवेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.अशोक मेनकुदळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जयेश हातगावकर, बसव क्लबचे अध्यक्ष अनिल बेगडे, सचिव अमर केळकर, महिला मंडळाच्या अध्यक्षा शुभदा हातगावकर मंचावर उपस्थित होते.यावेळी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. एकापेक्षा एक सरस असे चित्र मुलांनी कागदावर रेखाटली.
या स्पर्धेमध्ये अ गटातून प्रथम क्रमांक साईश घंटेवार, द्वितीय क्रमांक श्लोक चांदेकर आणि तृतीय क्रमांक रुद्राक्ष मानेकर यांनी मिळविला. ‘ब’ गटातून प्रथम सानिका मिरासे, द्वितीय अस्मिता बेंद्रे, तृतीय सावी उरगुंडे यांनी मिळविला. तसेच रांगोळी स्पर्धेमध्ये ओटीच्या साहित्यातून देवीचा मुखवटा तयार करणे हा विषय देण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक स्मिता गाढवे, द्वितीय क्रमांक रिता चांदेकर, तृतीय क्रमांक स्नेहल महाजन यांनी मिळविला. डिश डेकोरेशन स्पर्धेत प्रथम क्रमांक कल्पना देशमुख, द्वितीय क्रमांक नीता इसासरे, तृतीय क्रमांक सुजाता उरगुंडे यांनी मिळविला. त्यानंतर वेशभुषा स्पर्धेमध्ये चिमुकल्या सई शेटे हिने झाशीची राणी यांची सुंदर वेशभुषा साकारून प्रथम क्रमांक पटकाविला.
ब गटामध्ये मयंक रामापुरे याने वृत्तपत्र ही वेशभुषा करुन मनोगत व्यक्त करून प्रथम क्रमांक पटकावला. तसेच एकल नृत्य स्पर्धेमध्ये अ गटामध्ये प्रथम क्रमांक अवंती बिल्लावार, द्वितीय क्रमांक सिध्दी अमलामुरे, तृतीय क्रमांक अर्णव रामापुरे आणि ब गटातून प्रथम सानिका मिरासे, द्वितीय तन्वी राखडे, तृतीय ईश्वरी चांदेकर यांनी पटकविला.
संगीत संध्या कार्यक्रमात गीत सादर करण्यात आले. कल्याणी अलंकार द्वारा विजेत्यांना सन्मान चिन्ह आणि पारितोषिक प्रदान करण्यात आले.संचालन संजय माटे व शिल्पा बेगडे यांनी केले. आभार नीलेश शेटे यांनी मानले. यशस्वीतेकरिता अध्यक्ष अनिल बेगडे, संजय कोचे, विनोद नारींगे, अमर केळकर, चिरायू हातगावकर, नीलेश शेटे, डॉ. किशोर मांडगावकर, महेंद्र ठोंबरे, मंगेश शेटे, नागेश कुल्ली, प्रदीप उमरे, संजय माटे, गिरीश गाढवे, शीतल हातगावकर, उज्ज्वला नारींगे, उषा कोचे, कल्पना देशमुख, शिल्पा बेगडे, वैशाली केळकर, स्मिता हातगावकर, तेजश्री मानेकर, प्रांजली ठोंबरे, स्मिता गाढवे, रश्मी अंदूरकर, सुवर्णा निकडे इत्यादींनी परिश्रम घेतले.