बहुजननामा ऑनलाईन टीम – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती विरोधात नुकतीच 7 पानांची FIR दिली आहे. यात असाही उल्लेख आहे की, सुशांतला अशी भीती होती रिया त्याला त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियान हिच्या आत्महत्येच्या केसमध्ये अडकवेल. सुशांतनं सुसाईडच्याआधी अनेकदा गुगल चेक केल्याचंही बोललं जात आहे. दिशाच्या मृत्यूमुळं सुशांत चिंतीत असल्याचंही त्याच्या फॅमिली लॉयरनं सांगितलं आहे.
रिया चक्रवर्ती विरोधात केस दाखल झाल्यानंतर सुशांतच्या वडिलांचे वकिल विकास सिंह यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. विकास यांनी सांगितलं आहे की, सुशांतची एक्स मॅनेजर दिशाच्या मृत्यूनंतर सुशांतच्या मेंटल हेल्थवर खूपच परिणाम झाला होता. सुशांतला भीती होती की, त्याला या प्रकरणात फसवलं जाईल. तो सतत गुगल चेक करत असल्याचंही समोर आलं आहे.
विकास यांनी सांगितलं की, रिया गेली आणि त्याच रात्री दिशा सालियान हिचं निधन झालं. यानंतर बातम्यांमध्ये सुशांतच्या एक्स मॅनेजरची आत्महत्या अशा हेडलाईन्स दिसत होत्या. यामुळं सुशांत अधिक घाबरला होता. या केसमध्ये त्याला अडकवलं जाऊ नये अशी त्याला भीती होती. यामुळं तो वारंवार गुगल चेक करत होता. एवढंच नाही तर रियानं सुशांतचा नंबर ब्लॉक केल्यानं तो जास्तच निराश होता. विकास सिंह म्हणाले, सुशांतची मानसिक स्थिती पाहता रियानं त्याला सोडून जायला हवं होतं का ? रियानं नबंर ब्लॉक केला म्हणून तो आणखीच वैतागला होता असंही ते म्हणाले आहेत.