नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जेव्हा जेव्हा भारतात लोकप्रिय स्कूटरची चर्चा होते तेव्हा लोक वेस्पाबद्दल अधिक उत्सुक असतात. कंपनी सध्या या स्कूटरच्या इलेक्ट्रिक अवतारवर काम करत आहे. ज्यास पियाजिओ इंडियाने ऑटो एक्सपो 2020 च्या दरम्यान या वर्षाच्या सुरुवातीस सादर केले होते. तथापि, त्यावेळी कंपनीने हा स्कूटर भारतात लाँच करण्याबाबत नकार दिला होता.
दरम्यान आता मीडियाशी झालेल्या चर्चेदरम्यान कंपनीच्या अधिकाऱ्याने याची पुष्टी केली आहे की वेस्पा इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच होईल. तथापि, हा वेस्पाचा वेस्पा इलेट्रिक अवतार असणार नाही. म्हणजेच ऑटो एक्सपो 2020 च्या दरम्यान जे मॉडेल पाहायला मिळाले होते त्याऐवजी इटालियन दुचाकी वाहन निर्माता विशेषतः भारतासाठी डिझाइन केलेले एक नवीन मॉडेल तयार करेल.
इलेक्ट्रिक पॉवरट्रेनवर कंपनी करत आहे काम
वास्तविक पाहता कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, सध्या पियाजिओ भारतात आगामी वेस्पा इलेक्ट्रिक स्कूटरसाठी उपयुक्त पॉवरट्रेन वर निर्णय घेण्याचा प्रयत्न करीत आहे. आम्ही आमच्या दुचाकी वाहनांसाठी आमच्या स्वत:च्या डिझाइन आणि स्वत:च्या तंत्रज्ञानाचा उपयोग करतो. हे नवीन वेस्पा इलेक्ट्रिक स्कूटरवर देखील लागू केले जाईल. आम्ही भारतीय बाजारासाठी योग्य पॉवरट्रेन शोधत आहोत.
युरोपियन बाजारात वेस्पा
अधिक माहिती म्हणजे युरोपियन बाजारात वेस्पा इलेक्ट्रिकला 4KW ब्रशलेस डीसी इलेक्ट्रिक मोटरसह लाँच केले जाते, जो 200 एनएमपेक्षा जास्त टॉर्क देतो. हा स्कूटर सिंगल चार्जवर जास्तीत जास्त 100 किमीची रेंज प्रदान करतो आणि यास चार तासात पूर्णपणे चार्ज केले जाऊ शकते.
या वेस्पा इलेट्रिकाला एक गोल हेडलॅम्प, एक बोल्ड फ्रंट एप्रनसह फ्रंटमध्ये कॉन्ट्रास्ट रंगाचे एअरवेन्ट्स आणि एप्रन माउंटेड इंटिग्रेटर मिळतात. त्याच वेळी, त्याच्या साईड पॅनेलला एक साफ डिझाइन मिळते तर मागील बाजूस स्पोर्ट्स एलईडी टेल लाईट देण्यात आले आहे. याच्या इतर फीचर्समध्ये अॅलोय व्हील्स, 4.3 इंचाचा संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनेलचा समावेश आहे. ज्यामध्ये ब्लूटूथच्या माध्यमाने स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि रिव्हर्स मोड इत्यादींचा समावेश आहे.