बहुजननामा ऑनलाईन
लासलगाव येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ श्रीधर दायमा यांची गायनॅक सर्जन्स लॅपरोस्कोपी च्या काैशल्याची पारख करण्यासाठी अायाेजित केलेल्या स्पर्धेत द्वितीय क्रमांकाने निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार गणेश चॅरिटेबल ट्रस्ट व डी के जगताप मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आला.
देशातील विविध भागातून अनेक स्त्रीरोग तज्ज्ञांनी या स्पर्धेत भाग घेऊन उत्कृष्ट शस्त्रक्रिया केल्याची चित्रफीत ऑनलाइन पध्दतीने स्पर्धेच्या आयोजकांना पाठवली होती त्या मध्ये १५ स्पर्धकांची निवड करण्यात आली,त्यानंतर या पंधरा स्पर्धकांना इंटरनेटच्या सहाय्याने व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रश्न उत्तरे विचारण्याचा कार्यक्रम झाला त्या मध्ये डॉ श्रीधर दायमा यांनी दुसरा क्रमांक पटकावला असून बक्षिस अंतर्गत सुमारे २० हजार रुपयांचे लेप्रोस्कोपिक सर्जरी ला लागणारे साहित्य मिळणार आहे.
या प्रसंगी संजय शेवाळे यांची निफाड पंचायत समितीच्या उपसभापती निवड झाल्याबद्दल व संपतराव नागरे यांची उत्तर महाराष्ट्र भाजप ओ बी सी सेल संयोजक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा ही सत्कार या वेळी करण्यात आला
या वेळी ट्रस्ट चे अध्यक्ष डी के जगताप,बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप,प्रकाश दायमा,संतोष पलोड,कैलास सोनवणे,डॉ सुबोध पटणी,डॉ श्रीनिवास दायमा,नीरज भट्टड,
मदन दायमा,राजू राणा,वाल्मिकराव गायकवाड,मनोज भावसार,राजेंद्र चाफेकर,अरुण भांबारे,योगेश पाटील,किशोर जाधव,रवींद्र होळकर,संतोष पवार,कैलास दायमा,ज्योती शिंदे,स्मिता कुलकर्णी,बापू लचके,अशोक दायमा,अनिल वाघ आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्तावित प्राध्यापक समीर देवडे यांनी केले