बहुजननामा ऑनलाईन टीम : अभिनेता कुशल बद्रिकेच्या (Kushal Badrike) पोस्टची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. त्याच्या पोस्ट बरोबरच पोस्टवर दिलेले कॅप्शन हे चाहत्यांचे मन वेधून घेत असते. कुशल बद्रिके (Kushal Badrike) हा नेहमी सोशल मीडियावर (Social Media) अॅक्टिव्ह असतो. कधी पत्नी सुनयनाबरोबरचा (Sunaya) तर कधी मित्र विजू माने (Viju Mane) यांच्या सोबतचे फोटोज व्हिडिओज तो नेहमी शेअर करत असतो. अशाच पद्धतीचा त्याची एक पोस्ट सध्या चाहतांना भुरळ घालत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या पोस्टमध्ये कुशल बद्रिकेने (Kushal Badrike) दिवाळीनिमित्त शुभेच्छा (Diwali Wish) देत भन्नाट पोस्ट शेअर केली. यामध्ये तो फटाकड्यांमधील दारूगोळा एकत्रित करताना दिसत आहे. या फोटोला त्यांनी अतिशय सुंदर असे कॅप्शन देत म्हणाला की, “ही एक खोडी मला बालपणापासून आहे, वात नसलेले आणि न पेटलेले “फटाके” गोळा करायचे आणि त्यातली दारू एकत्र करुन पेटवून द्यायची. त्याशिवाय माझी दिवाळी कधीच पूर्ण झाली नाही. आज इतकी वर्ष गेली पण माझी ही सवय काही गेली नाही. मला वाटतं, दिवाळीचा फराळ संपल्यानंतर डब्बे नीट तपासून पाहिले तर तुकड्या तुकड्यात “चकली, शंकरपाळ्या” सापडतात ना! डब्याच्या तळाशी “करंजीचं सारण आणि अनारस्याच्या खसखस” मध्ये मिसळलेला जरासा “चिवडा” सापडतोच ना! तसंच आपण कितीही मोठे झालो तरी आपल्यात उरलेलं थोडसं “बालपण” आपल्याला सापडतच !! फक्त डबे नीट तपासून घ्यायला हवेत, तळाशी कुठेतरी असतच हे “बालपण”“अगदी लाडवातल्या “मनुक्या” एवढ का होईना, ते आपल्यात उरतच”
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
त्याच्या या कॅप्शन ने चाहते तर चांगलेच भावनिक झाले. त्याच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत म्हणाले, “तुम्ही चुकीच्या फिल्डमध्ये आहात जर तुम्ही थोडसं लक्ष दिलात तर योगेश आणि निलेश यांचा जॉब खाऊ शकता”. तर काहींनी “किती छान लिहितात सर” अशा पद्धतीचे प्रोत्साहन देणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुशल ला ‘चला हवा येऊ द्या’ च्या शोमध्येच प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्यांनी ‘पांडू’ चित्रपटात त्याचबरोबर ‘स्ट्रगलर साला’ वेब सिरीज मध्येही उत्तम कामगिरी करून चाहत्यांचे मन जिंकले.
Web Title :- Kushal Badrike | kushal badrike shared childhood memory of diwali in an instagram post
हे देखील वाचा :