पुणे : – Kondhwa Pune Crime News | नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध (Immoral Relationship) असल्याच्या संशयावरून पत्नीने पतीच्या गळ्यावर सुरीने वार (Stabbing Case) केल्याची घटना कोंढवा भागात घडली. याप्रकरणी महिलेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. योगेश विलास वाघमारे (वय-39 रा. चंद्रभागानगर, कोंढवा) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणी कोमल योगेश वाघमारे (वय-35) हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 118(1), 115(2), 352 नुसार गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात योगेश वाघमारे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश यांचे नात्यातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय कोमल यांना होता. या कारणावरुन दोघांमध्ये सतत वाद होत होते. सोमवारी (दि.1) रात्री त्यांच्यात पुन्हा वाद झाले. त्यावेळी कोमलने स्वयंपाकघरातील सुरीने योगेश यांच्या गळ्यावर वार केला. तसेच त्यांच्या खांद्याचा चावा घेतल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
भोंगा वाजवल्याच्या रागातून मारहाण
पुणे : संत तुकाराम महाराज पालखीचे दर्शन घेवून देवीच्या मंदिराजवळून जात असताना भोंगा वाजवल्याचा राग आल्याने दोघांनी दोन तरुणाला बांबूने बेदम मारहाण करुन जखमी केले. ही घटना सोमवारी (दि.1) रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास नाना पेठेतील भाजी मार्केटमधील देवीच्या मंदिराजवळ घडली. यामध्ये ओम अभय ढगे (वय-18 रा. मंगळवार पेठ), शक्ती उर्फ सच्चु आबु देवेंद्र हे जखमी झाले आहेत. याबाबत ओम ढगे याने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अमित उर्फ पैलवान पाटोळे व त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे.