पुणे : – Kondhwa Pune Crime News | अंडरर्ल्डशी माझे डायरेक्ट संबंध आहेत, पोलीस मी खिशात घेऊन फिरतो, तुझा अजय भोसले करीन, त्याला जसा ठोकला तसा तुला ठोकीन, तो वाचला पण तू वाचणार नाही, अशी धमकी देऊन इस्टेट एजंटची एक कोटी 32 लाखांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अग्रवाल पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अग्रवाल यांच्या साथीदाला शुक्रवारी (दि.7) कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) अटक केली आहे. त्याला न्यायलयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
याबाबत मुश्ताक शब्बीर मोमीन (वय-45 रा. कौसरबाग, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन सुरेंद्रकुमार ब्रह्मदत्त अग्रवाल Surendra Kumar Agarwal (वय-77) बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल Vishal Surendrakumar Agarwal (वय-50), जसप्रीतसिंग राजपाल (Jaspreet Singh Rajpal) यांच्यावर आयपीसी 420, 406, 504, 506, 120(बी), 392, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. कोंढवा पोलीसांनी राजपाल याला शुक्रवारी अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. राजपाल याच्या वतीने अॅड. हर्षवर्धन पवार (Adv Harshvardhan Pawar) यांनी युक्तीवाद केला. तर अॅड. अक्षय वायकर (Adv Akshay Waykar) यांनी मदत केली.
सरकारी वकीलांनी राजपाल यांची सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली केली होती. यावर अॅड. हर्षवर्धन पवार यांनी युक्तीवाद करताना, जुन्या वादातून तक्रार दाखल केली आहे. 2019 चा हा वाद आहे. 2019 साली याच वादातून आयपीसी 156(3) ची तक्रार राजपाल यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी ही तक्रार समजुतीने मिटवण्यात आली होती. पण अग्रवाल जेलमध्ये गेल्यानंतर त्याचा फायदा घेण्यासाठी खोटी तक्रार दाखल केली आहे. आरोपी कडून काहीही जप्त करायचे नाही असे सांगितले. युक्तिवाद ऐकून न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
काय आहे प्रकरण?
फिर्यादी मुश्ताक मोमीनची एम.एम. असोसीएटस व वास्तू प्रॉपर्टीज या नावाची इस्टेट एजंन्सी आहे. पुणे आणि इतर शहरात प्लॉट डेव्हलपमेंट आणि त्यासंदर्भातील परवाने मिळवून देण्याचे काम फिर्यादी करतात. सुरेंद्र अग्रवाल, विशाल अग्रवाल आणि जसप्रीतसिंह राजपाल यांचे कोंढव्यातील ब्रह्मा काउन्ट च्या मागे असणाऱ्या जागेवरुन निवृत्ती कोपरे यांच्यासोबत वाद होते.
आरोपींनी फिर्यादी यांची जुलै 2019 मध्ये भेट घेऊन जागेचा वाद मिटवून देण्याबाबत विचारणा केली होती. यानंतर फिर्यादी यांनी परवान्याचे कामे करुन जागेवरील वाद मिटवून देतो असे सांगितले. यानंतर त्यांच्यामध्ये वाटाघाटी करुन जागेचा वाद सोडवून दिल्यास तसेच जागे बाबत काही कामे करुन दिल्यास दीड कोटी रुपये मानधन देण्यस करार केला होता. मात्र, आरोपींनी पैसे न देता मुश्ताक मोमीन यांची आर्थिक फसवणूक केली.