कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – Kolhapur Rain | कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे (Kolhapur Rain) पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणचे रस्ते पाणीखाली गेले आहेत. गगनबावडा हा सह्याद्री पर्वतरांगेवरील डोंगराळ तालुक्यातील अणदूर धुंदवडे रस्ता धुवांधार पावसामुळे (Kolhapur Rain) तब्बल १५ फूट खचला आहे. रस्ता खचल्याने हा परिसरातील किमान १५ ते २० गावांचा संपर्क तुटला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
कोल्हापूर जिल्ह्याचा निम्मा भाग हा डोंगराळ आहे. या भागात गेल्या ८ दिवसांपासून तुफान पाऊस सुरु आहे. त्यामुळे अणदूर धुंदवडे हा घाट रस्ता अनेक ठिकाणी खचला आहे.
अनेक ठिकाणी रस्ताचा संपूर्ण भाग जवळपास १५ फूट खाली गेला आहे. दोन ते तीन ठिकाणी हा रस्ता खाली गेला आहे. त्यावरुन पायी चालणेही मुश्किल झाले आहे. त्यामुळे हा संपूर्ण रस्ता नव्याने बांधावा लागणार आहे.
काल ही घटना घडली असली तर पावसाचा जोर असल्याने व परिसरात नेटवर्क नसल्याने हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नव्हता. आज सकाळी पावसाचा जोर कमी झाल्यावर लोक घराबाहेर पडले.
तेव्हा हा प्रकार लक्षात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात आता पावसाचा जोर ओसरला आहे.
काल दिवसभरात कोल्हापूर शहरात पाऊस थांबला होता.
पण अजूनही अनेक भागात पाणी शिरलेले असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Web Title : Kolhapur Rain | In Kolhapur, 20 villages were cut off due to 15 feet of road damaged
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Income Tax | प्राप्तीकर विभागाचा दावा, दैनिक भास्कर ग्रुपने केली 700 कोटी रुपयांच्या टॅक्सची ‘चोरी’