कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाइन – कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने (Kolhapur North By-Election BJP) माजी नगरसेवक आणि धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचे समर्थक सत्यजित ऊर्फ नाना कदम (Satyajit Alias Nana Kadam) यांना देण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) ही घोषणा करणार आहेत. (Kolhapur North By-Election BJP)
आमदार चंद्रकांत जाधव (MLA Chandrakant Jadhav) यांचे निधन झाल्याने निवडणुक आयोगाने कोल्हापूर उत्तर मधील पोटनिवडणुक (Kolhapur North By-Election BJP) जाहीर केली आहे. या जागेवर १२ एप्रिल रोजी मतदान होणार असून १६ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी १७ मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे.
सत्यजित कदम हे शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते शिवाजीराव कदम (Shivajirao Kadam) यांचे चिरंजीव आहेत. कदम यांनी २०१४ मध्ये काँग्रेसतर्फे याच मतदारसंघातून निवडणुक लढविली होती. त्यात त्यांनी दुसर्या क्रमांकाची मते मिळविली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून (NCP) भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. त्यांच्याबरोबर कदमही भाजपचे काम करु लागले. कदम हे महाडिक यांचे पाहुणे आहेत.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव (Mahesh Jadhav) यांनीही भाजपकडे तिकीट मागितले होते. त्यांनीही २०१४ मध्ये याच मतदार संघातून निवडणुक लढवून ४० हजार मते मिळविली होती. काँग्रेसकडून (Congress) या जागेवर दिवंगत आमदार जाधव यांच्या पत्नी जयश्री चंद्रकांत जाधव (Jayshree Chandrakant Jadhav) यांना उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे आता ही निवडणुक दुरंगी होणार आहे.
Web Title :- Kolhapur North By-Election BJP | bjp confirms satyajit Alias Nana kadam candidate for kolhapur north by election
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update