मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) चा सध्या 12 वा सीझन सुरू आहे. याच्या कर्मवीर स्पेशल एपिसोडमध्ये अनेक खास व्यक्ती येताना दिसत आहेत. अशीच एक व्यक्ती शुक्रवारच्या कर्मवीर एपिसोडमध्ये येणार आहे. डॉ. अरुणिमा सिन्हा (Arunima Sinha) असं तिचं नाव आहे. अरुणिमा जगातील पहिली दिव्यांग गिर्यारोहक आहे.
सोनी चॅनेलनं आगामी एपिसोडचा एक प्रोमो सोशलवर शेअर केला आहे. यात अरुणिमा सिन्हा आपल्या अचिव्हमेंट आणि सर्वांत कठीण कार्याबद्दल सांगितलं आहे. डॉ. अरुणिमा सिन्हा यांनी माउंट एव्हरेस्ट सर केला आहे. त्या जगातील पहिल्या दिव्यांग गिर्यारोहक महिला आहेत.
बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी सांगितलं की, माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वांत उंच शिखर गिर्यारोहकांसाठी एक कठीण आव्हान असतं. हे शिखर सर करणं सर्वांनाच शक्य होत नाही. परंतु अरुणिमाजी यांनी पाय गमावल्यानंतरही हे शिखर सर केलं आणि भारताचा ध्वज फडकवला. माउंट एव्हरेस्ट सर करणारी जगातील पहिली महिला दिव्यांग गिर्यारोहक, तेंजिंग नोर्गे अवॉर्डनं सन्मानित, पद्मश्री डॉ. अरुणिमा सिन्हा यांचं अभिनंदन.
यात अरुणिमा यांनी त्यांच्या रेल्वे अपघाताबद्दलही सांगितलं आहे. त्यांची स्टोरी खूप इमोशनल करणारी आहे. अरुणिमा यांनी एव्हरेस्ट सर करण्याचा निर्णय कसा घेतला आणि त्यांना ही प्रेरणा कशी मिळाली, याबाबतही त्यांनी सांगितलं आहे.