श्रीनगर : वृत्त संस्था – उत्तर काश्मीर (North Kashmir) मधील सोपोर परिसरातील गुंड ब्रथ भागात रविवारी रात्री उशिरा सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत तीन अतिरेक्यांना ठार करण्यात यश आले आहे. लष्कर ए तैयबा (Lashkar-e-Taiba) चे टॉप अतिरेक्यावर १० लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
सोपोर परिसरात अतिरेकी शिरल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दला (Security Forces) ने या परिसरात सर्च सुरु केला. त्यावेळी अतिरेक्यां (Terrorist ) नी पळून जाण्यासाठी सुरक्षा दलावर गोळीबार(Firing) करण्यास सुरुवात केली.
त्याला सुरक्षा दलाने गोळीबाराने प्रतिउत्तर दिले. सुरुवातीला एक अतिरेकी चकमकीत मारला गेला. त्यानंतर आणखी इतर दोन अतिरेकी ठार झाले.
आई जीपी कश्मीर विजय कुमार यांनी सांगितले की, लष्कर ए तैयबाचा टॉप अतिरेकी मुदासिर पंडित याचा तीन पोलीस कर्मचारी, दोन लोकप्रतिनिधी आणि दोन नागरिकांच्या हत्येमध्ये सहभागी होता.
मुदासिर विरुद्ध १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
J&K: Three terrorists, including top LeT terrorist Mudasir Pandit, killed in an encounter with security forces at Gund Brath area of Sopore. Security forces are carrying out the operation.
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/b3fHTayrwZ
— ANI (@ANI) June 21, 2021
या अगोदर शनिवारी जम्मू काश्मीर पोलिसां(Jammu and Kashmir Police)नी बारामुल्लामध्ये नार्को टेरर मॉड्यूलचा पर्दाफाश केला. पोलिसांनी १२ जणांना अटक केली,
असून त्यांच्याकडून हेरॉईनची ११ पाकिटे, १० ग्रेनेड, ४ पिस्तुल आणि काडतुसे तसेच २१ लाख ५० हजार रुपयांची रोकड व १ लाख रुपयांचा चेक हस्तगत करण्यात आला आहे.
web title: 3 militants killed in clashes with security forces in Kashmir; Mudasir Pandit ‘Dher’ with Rs 10 lakh prize
M-Yoga App जगभरातील लोकांसाठी M-Yoga App ची PM नरेंद्र मोदी यांची घोषणा !
French Kiss करण्याने होऊ शकतात ‘हे’ 5 गंभीर आजार, जाणून घ्या Lip आणि French किसचे साईड इफेक्ट
PM Kisan Sanman Nidhi | 30 जूनपूर्वी रजिस्ट्रेशन केल्यास 4,000 रुपये मिळवण्याची संधी, जाणून घ्या कसे