पंढरपूर : बहुजननामा ऑनलाईन – कार्तिकी एकादशीनिमित्त (Kartiki Ekadashi) पंढरपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या हस्ते पहाटे विठ्ठल रुक्मिणीची महापूजा (Vitthal Rukmini Mahapuja) करण्यात आली. यावेळी औरंगाबादचे वारकरी उत्तमराव साळुंखे (Warkari Uttamrao Salunkhe) आणि कलावती साळुंखे (Warkari Kalavati Salunkhe) यांना महापूजेचा मान मिळाला. (Kartiki Ekadashi)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पंढरीचा वारकरी ।
वारी चुको नेदी हरी ।
हेची व्हावी माझी आस ।
जन्मोजन्मी तुझा दास ॥
मी खरोखर भाग्यवान आहे!
4 वर्षे आषाढी आणि आता आज कार्तिकी एकादशी ! #कार्तिकी_एकादशी #एकादशी #कार्तिकीएकादशी #KartikiEkadashi #JaiHari #विठ्ठल @fadnavis_amruta pic.twitter.com/7JGhpRmP1U— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 4, 2022
कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाच्या शासकीय महापूजेवेळी मानाच्या वारकरी म्हणून दर्शन रांगेतून माळकरी भाविकांची निवड केली जाते. यंदाच्या वर्षी हा मान उत्तमराव माधवराव साळुंखे (वय ५८) आणि कलावती उत्तमराव साळुंखे (वय ५५, रा. शिरोडी खुर्द, फुलंबी, जि. औरंगाबाद) यांना मिळाला आहे. हे पतीपत्नी मागील ५० वर्षांपासून विठुरायाची यात्रा करीत आहेत.
यंदा शासकीय महापूजेचा मान 50 वर्षे वारी करणाऱ्या मानाचे वारकरी श्री उत्तमराव माधवराव साळुंखे व श्रीमती कलावती साळुंखे (मु.पो. शिरोडी खुर्द, तालुका- फुलंब्री, जिल्हा -औरंगाबाद) यांना मिळाला.
त्यांच्यासमवेत विठुनामाचा गजर करीत शासकीय महापूजा केली आणि….#कार्तिकी_एकादशी #एकादशी pic.twitter.com/kSHfLyhZlE
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 4, 2022
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
कार्तिकी यात्रेनिमित्त (Kartiki Ekadashi) श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या
(Shri Vitthal Rukmini Temple Committee) वतीने नामदेव पायरी, विठ्ठल सभामंडप, विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभार्यात सुंदर व आकर्षक अशा फुलांची आरास करण्यात आली आहे.
…. राज्यातील कष्टकरी, शेतकर्यांच्या, जनतेच्या कल्याणाची कामना केली. माझी पत्नी अमृता फडणवीस सुद्धा सोबत होत्या.#कार्तिकी_एकादशी #एकादशी #कार्तिकीएकादशी #KartikiEkadashi #JaiHari #विठ्ठल pic.twitter.com/7TjSgcCEij
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 4, 2022
याअगोदर महापूजेसाठी मंदिरात येण्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस हे
वारकर्यांच्या मेळ्यात सहभागी झाले. त्यांनी भजनात सहभागी होत फुगडीचा फेर धरला होता.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1588375482508414977?s=20&t=EfoWwsgN3JAKWRnZNonoyQ
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Kartiki Ekadashi | A couple from Aurangabad became the champions of Mahapuja; Consort Mahapuja of Panduranga by the Deputy Chief Minister
हे देखील वाचा :
Pune Crime : फरार सराईत गुंड रुपेश मारणे आणि संतोष शेलारला मुळशीतून अटक