बहुजननामा ऑनलाइन टीम – कल्याण पूर्व येथे दुचाकीवरून रस्त्यावर जात असताना तिथं बॅरिकेट्सऐवजी नायलॉन दोरी लावलेली होती. ह्या नायलॉन दोरीमुळे दोन मित्रांचा जीव गेला आहे. हि धक्कादायक घटना घडली आहे. मुकेश राय आणि योगेश सांगळे अशी मृतांची नावे आहेत.
अधिक माहिती अशी, कल्याण पूर्व येथील योगेश सांगळे (रा.कोळसेवाडी), मुकेश राय (रा.जिम्मी बाग परिसर) हे दोघे चांगले मित्र होते. गुरुवारी (ता.११) योगेशला कामावर जायचं होतं म्हणून मुकेश राय त्याला आपल्या दुचाकीवर बसवून कल्याण रेल्वे स्टेशनला निघाला. लोकल ७ नंबर प्लेटफॉर्मवर उभी होती. ७ नंबर प्लॅटफॉर्मच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर जात असताना तिथं बॅरिकेट्सऐवजी नायलॉन दोरी लावलेली होती. हीच नायलॉन दोरी मुकेशच्या गळ्यात अडकली. त्याचा गळा कापला गेला. तो खाली पडला. यानंतर त्याच्या पाठीमागे बसलेला त्याचा मित्र योगेशही गाडीच्या खाली आपटला गेला. या अपघातात दोघांचाही दुदैवी मृत्यू झाला.
दरम्यान, बॅरीकेट ऐवजी नायलॉनची दोरी लावली होती. दोरी न दिसल्याने हा प्रकार घडला. या प्रकरणी जे कोणी दोषी आहेत त्यांच्याविरोधात ठोस कारवाई झाली पाहिजे. असे मुकेशच्या कुटुंबियांकडून म्हटले आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरिक्षक अनिल पोवार यांनी पुढील तपास करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.