पुणे : बहुजननामा ऑनलाईन – जोशी स्पोर्ट्स तर्फे आयोजित पहिल्या ‘जोशी स्पोर्ट्स करंडक’ प्रिमिअर लीग टी-२० क्रिकेट (Joshi Sports Cup Premier League T20 Cricket) स्पर्धेत स्पार्टन्स् क्रिकेट क्लब संघाने एलके इलेव्हन संघाचा पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. (Joshi Sports Cup Premier League T20 Cricket)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सिंहगड रोडवरील व्हिजन क्रिकेट अॅकॅडमीच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात किरण दातार याच्या ८६ धावांच्या खेळीमुळे स्पार्टन्स् संघाने एलके इलेव्हन संघाचा १७ धावांनी पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. पहिल्यांदा फलंदाजी करताना स्पार्टन्स् क्रिकेट क्लबने २० षटकामध्ये ६ गडी गमावून १८५ धावांचे आव्हान उभे केले. किरण दातार याने ४९ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांसह ८६ धावांची खेळी साकारली. सलामीवीर भूषण सवे याने ३१ धावांचे योगदान दिले. यामध्ये विपुल खैरे (३-२९) याने अचूक गोलंदाजी केली. या आव्हानासमोर एलके इलेव्हन संघाचा डाव १६८ धावांवर मर्यादित राहीला. गिरीष कोंडे याने ५१ धावांची खेळी केली.
तिसर्या क्रमांकासाठीच्या सामन्यात उत्कर्ष चौधरी अष्टपैलू खेळीच्या जोरावर ग्लोबल वॉरीयर्स संघाने कल्याण संघाचा ६३ धावांची पराभव केला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धेचे संचालक आणि जोशी स्पोर्ट्सचे कार्यकारी संचालक गणेश जोशी यांच्या हस्ते करण्यात आला.
विजेत्या स्पार्टन्स् क्रिकेट क्लबला तसेच उपविजेत्या एलके इलेव्हन संघाला करंडक आणि मेडल्स् देण्यात आले.
सामन्याचा संक्षिप्त निकालः अंतिम सामनाः
स्पार्टन्स् क्रिकेट क्लबः २० षटकात ६ गडी बाद १८५ धावा (किरण दातार ८६ (४९, १० चौकार, ४ षटकार), भूषण सवे ३१,
नचिकेत कुलकर्णी १७, विपुल खैरे ३-२९, गणेश जोशी १-२३) वि.वि. एलके इलेव्हनः २० षटकात ७ गडी बाद १६८
धावा (गिरीष कोंडे ५१ (३४, ४ चौकार, २ षटकार), विपुल खैरे २५, अभिषेक बोधे २२, कृष्णा भट ४-२६,
विवेक कुबेर २-२८); सामनावीरः किरण दातार;
तिसर्या क्रमांकासाठीः ग्लोबल वॉरीयर्सः १९ षटकात ६ गडी बाद १६४ धावा (एस. शिंदे ५९ (४५, ५ चौकार, २ षटकार),
उत्कर्ष चौधरी ३३, मोहम्मद ताहीर २१, ऋत्विक महाजन २-७) वि.वि. कल्याण इलेव्हनः १४.५ षटकात १० गडी बाद
१०१ धावा (रोहीत गुगळे ४०, चिराग शेरकर २५, उत्कर्ष चौधरी ३-२६, विकी मंडल २-२१); सामनावीरः उत्कर्ष चौधरी;
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Joshi Sports Cup Premier League T20 Cricket | First ‘Joshi Sports Karandak’ Premier League T20 Cricket Tournament; Spartans Cricket Club Team Champion !!
हे देखील वाचा :