ठाणे : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यात (Mumbra Police Station) विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आपण राजीनामा देणार असल्याचे म्हटले आहे. रीदा रशीद (Rida Rashid) नामक महिलेने हा गुन्हा दाखल केला आहे. त्यावर आता रशीद या महिलेने आपली बाजू मांडली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या महिला भाजपशी संबंधित आहेत. त्यांनी सांगितले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या पूल उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो. यावेळी मुख्यमंत्री शिंदे कार्यक्रमावरुन परतत असताना, मी त्यांना भेटायला जात होते. मी त्यांच्या सचिवांना त्यांच्याशी भेट घालून देण्यासाठी सांगितले. सर्वच लोक त्यांच्या गाडीला लागून चालत होते. मधून चालायला जागा नव्हती. मी गाडीला लागून वाट काढत मुख्यमंत्र्यांना भेटायला जात होते. यावेळी डॉ. जितेंद्र आव्हाड (Dr. Jitendra Awhad) समोरुन आले. स्थानिक आमदार असल्याने मी त्यांना पाहून स्मीतहास्य केले. त्यावेळी त्यांनी मला ‘तू इथे काय करतेस’ म्हणत हाताने जोरात धरून बाजूला लोटले. त्यांनी मला धक्का देताना हा विचार केला नाही की, तिथे सर्व पुरुष होते. त्यांनी लोटल्यावर मी आजूबाजूच्या पुरुषांच्या अंगावर गेले. जे घडले ते सर्वांसमोर आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत.
तसेच राज्य सरकारने माझ्यावर गेल्या तीन दिवसांत दोन खोट्या केसेस दाखल केल्या आहेत.
त्यामुळे त्यांच्या दडपशाहीला, हुकुमशाहीला आणि पोलीस दलांच्या गैरवापराला कंटाळून मी राजीनामा देत आहे,
असे म्हटले आहे.
त्यांना राजीनामा न देण्याची विंनंती त्यांच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे.
तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ट्वीट करत, हे सरकार विरोधकांचा आवाज दाबत आहे.
आणि त्यांना कसे काय अटक करता येईल, अशा मनसुब्यात असल्याचे म्हंटले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Jitendra Awhad | bjp women worker who allege molestation by jitendra awhad comment on incidence
हे देखील वाचा :
Pune Pimpri Crime | सासऱ्याकडून सुनेचा विनयभंग, वडिलांची बाजू घेणाऱ्या पतीसह सासऱ्यावर FIR