नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशातच आता माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. या घटनेत १२ जणांनी चालत्या कारमध्ये एका महिलेवर बलात्कार केला आहे. तसेच या घटनेचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर वायरल करण्यात आला आहे. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेऊन त्या पीडितेला बोलावून घेत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात ३ जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना ६ महिन्यांपूर्वी घडली आहे, तसेच या प्रकरणात ३ कारमध्ये त्या महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आला व तिला मारहाण करण्यात आली.
उत्तर प्रदेशमध्ये चालत्या कारमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओबद्दल जेव्हा जयपूर पोलिसांना माहिती मिळाली तेव्हा त्यांनी या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली. या व्हिडिओमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सीएसटी तसेच शहरातील ४ जिल्ह्यांमधील पोलिसांना तपासासाठी आणि व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या लोकांची ओळख पटवण्याचे काम देण्यात आले. या व्हिडिओमधील पीडित महिला ही उत्तर प्रदेशमधील असल्याचे स्पष्ट झाल्यावर त्या महिलेला जयपूरमध्ये बोलावून मानसरोवर ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, १९ ऑक्टोबर २०२० रोजी ती न्यू सांगानेर रोडजवळील साई कृपा हॉटेलमध्ये थांबली होती तेव्हा तिच्या ओळखीच्या संजू बंगाली नावाच्या व्यक्तीने तिला पैशाचं आमिष देत एका मुलासोबत पाठवले. त्यानंतर त्या मुलाने महिलेला एका कारमध्ये बसवले. त्या कारमध्ये आधीपासूनच ४ जण बसले होते. यानंतर कारमधील व्यक्तींनी महिलेचा मोबाईल काढून घेतला आणि तिच्यावर बलात्कार केला, तर कारमधील दोघांनी तिचा व्हिडिओ बनवला. या दरम्यान अजून २ कार तिकडे आल्या आणि त्यांनी दुसऱ्या कारमध्ये घेऊन जात त्या महिलेवर पुन्हा अत्याचार केला. या घटनेत १२ जण सहभागी असल्याचे पीडितेकडून सांगण्यात आले आहे.
पीडित महिला या आरोपींमधील गुलाब आणि अभिषेक नावाच्या व्यक्तीला ओळखत आहे. यामधील गुलाबने पीडितेला धमकी दिली होती, की याबद्दल कोणालाही सांगितलं, तर तुझा व्हिडिओ व्हायरल करेल. याच भीतीमुळे पीडितेने ६ महिने होऊनसुद्धा कोणत्याही प्रकारची तक्रार केली नाही. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चार डीसीपी, 10 आयपीएस आणि 40 सीआयची टीम तयार करण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अजयपाल लांबाने यांनी दिली आहे. या व्हिडिओमधील आरोपींचा सुमारे १०० पोलीस शोध घेत आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, ही गँग अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करण्याचे काम करते. पोलिसांकडून सध्या बाकी आरोपींचा शोध सुरू आहे.