J.P. Nadda | ‘मोदींमुळे जगात भारताची प्रतिमा उंचावली, जगातील तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था ‘ – जे.पी. नड्डा (व्हिडिओ)
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे संपूर्ण जगात भारताची प्रतिमा उंचावली आहे. पायाभूत सुविधांना वेग देण्याबरोबरच सामान्य माणसासाठी अनेक कल्याणकारी योजना मोदी सरकारने (Modi Government) सुरु केल्या आहेत. सामान्य माणसाच्या जीवनमानात बदल घडला आहे. ही कामे सामान्य माणसांपर्य़ंत नेऊन निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी कटिबद्ध व्हा, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष (BJP National President) जे.पी. नड्डा (J.P. Nadda) यांनी केले. पुण्यात भाजप (Pune BJP) प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीचा समारोप गुरुवारी पुण्यात झाला. यावेळी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जे.पी. नड्डा (J.P. Nadda) बोलत होते.
जे. पी. नड्डा (J.P. Nadda) म्हणाले, महाराष्ट्रात आल्यावर मला ऊर्जा मिळत असते. मोदी सरकारच्या काळात मोठा विकास झाला आहे. देशात गेल्या 70 वर्षात 74 विमानतळे झाली. मोदी सरकारच्या 9 वर्षाच्या कार्यकाळात 74 विमानतळे झाली, हा बदल आहे. भाजप आणि एनडीए (NDA) म्हणजे विकास आहे. जगात मंदी आली आहे. भारत आपल्या नितीमुळे पुढे गेला आहे. भारताला मंदीच्या झळा बसल्या नाहीत. आपल्याकडून लोकांच्या खूप अपेक्षा आहेत. आज सरकारचा जो अभिनंदनाचा ठराव केला त्याला महाराष्ट्र सरकार (Government of Maharashtra) पात्र असल्याचे जे.पी.नड्डा यांनी सांगितले.
Addressing BJP Maharashtra Pradesh Karyasamiti Meeting in Pune, Maharashtra. https://t.co/G8rxGg4Htn
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) May 18, 2023
राज्यात अडीच वर्षाच महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) होते या सरकारच्या काळात विकासाची कामे थांबवलीत. त्यामुळे मविआ सरकार म्हणजे नुकसान, हे गावोगावी जाऊन भाजप कार्य़कर्त्यांनी जनतेला सांगितले पाहिजे. कोरोनाच्या काळात सर्व पक्ष आयसीयूत होते, परंतु भाजप सामाजिक कर्यात पुढे होता, याची आठवण जे.पी.नड्डा यांनी यावेळी कार्यकर्त्यांना करुन दिली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
जे.पी. नड्डा पुढे म्हणाले, काँग्रेसचा (Congress) आणि अभ्यासाचा आता काही संबंध उरलेला नाही.
ते काहींच्या काही बोलत आहेत. त्यामुळे त्यांच्या नादाला लागू नका. गेल्या चार पिढ्या आपला पक्ष अधारात होता,
कष्टाने देशात सर्वत्र सत्ता आली आहे. पक्ष मोठा होत असताना पक्षाचा वाईट काळ विसरुन चालणार नाही.
2014 नंतर जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा बदललेली आहे. ब्रिटनला मागे टाकत भारत जगातील
तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था (Economy) झाल्याचे नड्डा यांनी सांगितले.
जे.पी. नड्डांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
– सावरकरांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान
– तीस वर्षे गरिबी हटावचे राजकारण करुन गरिबी वाढवणारे आता आम्ही काय केले हा प्रश्न विचारत आहेत.
– काँग्रेस सोबत गेलो तर शिवसेना पक्ष बंद करेन असे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) म्हणाले होते हे
लोकांना सांगा
– मविआ म्हणजे महाराष्ट्राचा विकास रोखणारी आणि शिवसेना-भाजप युती (Shiv Sena-BJP Alliance) म्हणजे महाराष्ट्राचा विकास करणारी हे लोकांना सांगा.
Web Title : J.P. Nadda | ‘Modi raised the image of India in the world, the world’s third largest economy’ – J.P. Nadda (Video)
- Pune Crime News | सोलापूर मधील तथाकथित बलात्कारी पत्रकाराने पुण्यातील व्यावसायिकास मागितली 5 कोटीची खंडणी; गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून पाटस टोल नाक्याजवळ गोळीबार, महेश हनमे व दिनेश हनमे अटकेत
- Tulja Bhavani Temple News | भाविकांच्या संतापानंतर तुळजाभवानी मंदिर देवस्थानचा ड्रेस कोडवरून यु टर्न; निर्बंध घातले नसल्याचे स्पष्टीकरण
Comments are closed.