नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Indian Railways | रेल्वेने ट्रेनमध्ये काही नवीन प्रकारच्या कोचची सुरूवात केली आहे. आता कोडद्वारेच प्रवासी या कोचचे तिकिट बुक करताना आपल्या पसंतीची सीट निवडू शकतात. रेल्वेने देशभरात अनेक रूट्सवर विस्टाडोम कोचची सुद्धा सुरुवात (Indian Railways) केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
तिकिट बुक करताना कोड ठेवा लक्षात (Railway News Coach’s booking code)
रेल्वे अनेक एक्स्ट्रा कोचची सुरूवात करणार आहे. यामध्ये AC-3 टियरचा इकॉनॉमी क्लास सुद्धा आहे. अशाप्रकारच्या कोचमध्ये 83 बर्थ असतील. अजूनपर्यंत इकॉनॉमी क्लासच्या या थर्ड एसी कोचमध्ये सीट बुकिंगसाठी भाडे ठरवण्यात आलेले नाही.
अतिशय खास आहे विस्टाडोम कोच
पर्यटन लक्षात घेऊन रेल्वे अशाप्रकारचे कोच सादर करत आहे. विस्टाडोम कोचची सर्वात मोठी खासियत आहे की, प्रवासी ट्रेनच्या आत बसून बाहेरचे दृश्य पाहू शकतात. या कोचचे छत सुद्धा काचेचे असेल.
रेल्वे जवळपास प्रत्येक राज्यात अशी किमान एक ऐसी ट्रेन चालवणार आहे. सध्या हे विस्टाडोम कोच मुंबईच्या दादर ते गोवा-मडगावसाठी वापरले जात आहेत.
कसे होईल बुकिंग?
या सर्व कॅटेगरीचे कोच आणि सीटच्या कोडबाबत सर्व झोनच्या प्रिंन्सिपल चीफ कॉमर्शियल मॅनेजर्सना नोटिफाय केले गेले आहे. या अंतर्गत एसी क्लास इकॉनॉमी कोचचे बुकिंग कोड 3E असेल आणि कोच चा कोड M असेल. अशाप्रकारे विस्टाडोम एसी कोचचा कोड EV ठेवला आहे.
कोणत्या कोचचा बुकिंग कोड काय आहे ते जाणून घेवूयात…
कोच क्लास बुकिंग कोड कोच कोड
1 विस्टाडोम V.S. AC DV
2 स्लीपर S.L. S
3 एसी चेयरकार C.C C
4 थर्ड एसी 3A B
5 एसी थ्री टियर इकॉनॉमी 3E M
6 सेकंड एसी 2A A
7 गरीब रथ एसी थ्री टियर 3A G
8 गरीब रथ चेयरकार CC J
9 फर्स्ट एसी 1A H
10 एक्झीक्युटिव्ह क्लास E.C E
11 अनूभुती क्लास E.A K
12 फर्स्ट क्लास F.C F
13 विस्टाडोम एसी E.V E.V
Web Title :- indian railways new rule train reservation booking railways introduces new codes for seat booking
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Eknath Khadse | आठवडाभरापासून एकनाथ खडसे रुग्णालयात
Zika Virus | पुणे जिल्ह्यातील ‘झिका’ची अतिसंवेदनशील 79 गावांची जाहीर, वाचा लिस्ट