इंदापूर : बहुजननामा ऑनलाईन – उपजिल्हा रूग्णांलयीन प्रभारी वैद्यकीय अधिक्षक यांनी रूग्णांलयात स्त्रीरोग तज्ञांची गरज नसल्याने कामावर हजर होउन कामकाज करू नये अशा आशयाचे लेखी पत्र देवुन रूग्णांलयामध्ये सेवा बजावण्यास मनाई केल्याचा राग मनात धरून (कंत्राटी) वैद्यकीय अधिकारी याने त्याचे वरिष्ठा विरोधात बदनामीकारक व अपमानास्पद मजकुर लिहुन व्हाॅटसप ग्रुपवर टाकल्या प्रकरणी कंत्राटी डाॅक्ट रविरूद्ध प्रभारी वैद्यकीय अधिक्षक यांनी इंदापुर पोलीस ठाण्यात फिर्याद दीली असल्याची माहीती ठाणे अंमलदार बापु मोहीते यांनी दीली आहे.
डाॅ.शिरीष सुरेश साळुंखे ( इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय,कंत्राटी वैद्यकीय अधिकारी) रा.संत सावता माळीनगर, इंदापुर, ता.इंदापूर,जि.पूणे असे आरोपी डाॅक्टरचे नाव असुन डाॅ.सुहास राजाराम शेळके (वय 40), प्रभारी वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रूग्णांलय इंदापुर असे फिर्याद देणार्याचे नाव आहे.तर इंदापूर ना.संघर्ष समीती 3 या ग्रुपवर बदनामीकारक मजकुर असलेली पोष्ट आरोपीने टाकली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की आरोपी डाॅ. शिरीष साळुंखे याने दिनांक 27 आगष्ट 2020 रोजी फिर्यादी यांचे विरूद्ध अब्रुनुकसान कारक व अपमानास्पद मजकुर लिहुन तो मजकुर इंदापुर ना.संघर्ष समीती या व्हाॅटसप ग्रुपवर (छापुन)पोस्ट करून बदनामी केली आहे.त्यात म्हटले आहे की डाॅ.सुहास शेळके हे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक असल्याने ते अमली पदार्थाचे सेवन करून मद्यधुंद अवस्थेत उपजिल्हा रूग्णांलयात येतात, रूग्णांलयात बसुन अमली पदार्थाचे सेवन करतात, व येथील कर्मचार्यांना शिवीगाळ करतात. तसेच महिला परिचारीकांना धमकी देणे,शीकाऊ डाॅक्टर यांचेकडे पैशाची मागणी करतात. अशा प्रकारचा अपमानास्पद व अब्रुनुकसानकारक मजकुर पोस्ट करून डाॅ.सुहास शेळके यांची बदनामी केली असल्याबाबतची फिर्याद इंदापूर पोलीस ठाण्यात दीली असुन पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहे.