बहुजननामा ऑनलाईन टीम – कधी काय होईल सांगता येत नाही. याचाच एक उदाहरण म्हणजे अरेबियाच्या माराकेचमध्ये एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर मशिदचा एक इमाम त्याच्या अंत्ययात्रेत सामील होण्यासाठी आला होता. पण अंत्यसंस्काराच्या अगदी काही वेळा आधी मृत व्यक्ती जिवंत झाल्याने ते पाहून इमामला हृदयविकाराचा झटका आला आणि तो तेथेच खाली पडला. त्याच क्षणी त्या इमामचा मृत्यू झाला. मृत्यू कधी कोणाला कोठे येईल याचा काही नेम नसतो. हे या प्रसंगावरून लक्षात येते.
‘इफ इन सौदी अरेबिया न्यूज’ नुसार माराकेच शहरातील एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची डॉक्टरांनी घोषित केले. त्या व्यक्तीची श्वासाची गती हळू असल्याने ते डॉक्टरांच्या लक्षात न आल्याने त्यांनी त्या व्यक्तीला मृत घोषित केले. डॉक्टरांनी त्या व्यक्तीचे मृत्यू पत्रही जाहीर केले. त्या मुस्लिम व्यक्तीच्या कुटुंबाने अंत्ययात्रेची तयारी केली. त्यासाठी मशिदीतून इमामलाही बोलावले. इमामने अंत्ययात्रेच्या तयारीसाठी प्रार्थना म्हणायला सुरुवात केली. पण या दरम्यान मृत व्यक्ती जिवंत झाली. या व्यक्तीला पाहून इमाम इतके घाबरले की त्यांना तिथेच हृदयविकाराचा झटका आला.आणि त्याच जागी इमाम खाली कोसळले. जमलेल्या लोकांनी त्यांना त्वरित दवाखान्यात नेले. पण त्या आधीच त्या इमामचा मृत्य झाला होता. या घटनेमुळे तेथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये भीती निर्माण झाली.
तर आत ही बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर लोकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींच्या मते अल्लाहच्या इच्छेमुळे त्या इमामचा मृत्यू झाला. तर काहींनी या इमामच्या मृत्यूबद्दल सहानुभूती व्यक्त केली.