बहुजननामा ऑनलाईन – IAF MiG-21 Crash | भारतीय लढाऊ विमानाचा राजस्थानमध्ये (Rajasthan) भीषण अपघात झाला आहे. भारतीय हवाई दलाचे मिग-२१ या लढाऊ विमानाने सुरतगड (Suratgarh) येथून विमानाने उड्डाण केले होते. मात्र हे विमान सोमवारी (८ मे) सकाळी राजस्थानमधील हनुमानगडजवळ कोसळले (IAF MiG-21 Crash). अपघातादरम्यान वैमानिकाने (Pilot) प्रसंगावधान दाखवत पॅराशूटच्या मदतीने विमानातून उडी घेत आपला जीव वाचवला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मात्र, भारतीय हवाई दलाचे मिग-२१ हे लढाऊ विमान एका घरावर कोसळले. परिणामी या घरातील एका महिलेचा व एका पुरुषाचा र्दुदैवी मृत्यू झाला आहे. अद्याप हवाई दलाकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. (IAF MiG-21 Crash)
#WATCH | Indian Air Force MiG-21 fighter aircraft crashed near Hanumangarh in Rajasthan. The aircraft had taken off from Suratgarh. The pilot is safe. More details awaited: IAF Sources pic.twitter.com/0WOwoU5ASi
— ANI (@ANI) May 8, 2023
या घटनेबाबत स्थानिक पोलीसांकडून अशी माहिती देण्यात आली आहे की, या दुर्घटनेनंतर पायलटला एअरलिफ्ट (Airlift ) करण्यात आले आहे. वैमानिकासाठी हवाई दलाचे Mi 17 पाठवण्यात आले आहे. मिग-२१ ज्या छतावर पडले तिथे तीन महिला आणि एक पुरुष असे लोक उपस्थित होते. यामध्ये एका महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला. तर दोन महिला गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. 2
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- IAF MiG-21 Crash | indian-air-force-mig-21-
हे देखील वाचा :
Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : खडक पोलिस स्टेशन – बनावट सोने विकणार्या महिलेला अटक