बहुजननामा ऑनलाइन टीम –
मेष
आजचा दिवस संमिश्र आहे. मंगलकार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. पद आणि प्रतिष्ठा वाढेल. जोडीदाराच्या आरोग्याबाबत जागरूक रहा. बाहेर खाणे टाळा. राजकीय क्षेत्रातही प्रगती होईल. रोजगाराशी संबंधित जातकांची खास डिल फायनल होईल. यामुळे व्यवसायाला खूप फायदा होईल.
वृषभ
आजचा दिवस उत्तम लाभदायक आहे. कार्यक्षेत्रात अनुकूल वातावरण असेल, सहकारी देखील सहकार्य करतील. आज विवाहित मुलांसाठी विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. कायदेशीर वाद सुरू असल्यास तो संपेल. कुटुंबातील सदस्यांसह देवदर्शनासाठी जाऊ शकता. कुटुंबात एखादी शुभ घटना घडू शकते. यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य भाग घेतील.
मिथुन
आजचा दिवस खूप सर्जनशील असेल. नोकरी करणार्यांना आज जे काम करण्याची इच्छा असेल तेच काम मिळेल. ज्यामुळे त्यांचा प्रभाव वाढलेला दिसेल. संध्याकाळपर्यंत एखाद्या विशिष्ट कामाची जबाबदारी सोपविली जाऊ शकते. कुटुंबातील सर्व सदस्य यात मदत करतील. व्यवसायात पुढे जाण्यासाठी प्रवास देखील करू शकता. विद्यार्थ्यांना परीक्षेत मोठे यश मिळेल. शेजार्यांची वाद टाळा.
कर्क
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. जे काही मन लावून कराल त्यामध्ये योग्य वेळी यश मिळेल. जी अपूर्ण कामे अनेक दिवसांपासून पडून आहेत ती पूर्ण करण्याची वेळ आली आहे. ऑफिसमधील तुमच्या विचारांनुसार वातावरण तयार होईल. सहकारी कर्मचारी देखील सहाकार्य करतील. रात्री एखाद्या धार्मिक कार्यक्रमास जाऊ शकता. संततीकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. सासरच्या पक्षाकडून धनलाभाची शक्यता आहे.
सिंह
आजचा दिवस उत्तम लाभदायक आहे. खूप व्यस्त असाल, परंतु तरीही लव्ह लाइफसाठी वेळ काढाल. धर्म आणि अध्यात्माकडे रुची वाढेल. वरिष्ठ अधिकारी कामात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करतील, परंतु काळजी करू नका, ते यशस्वी होणार नाहीत. मालमत्ता खरेदी करायची असेल तर आजचा दिवस त्याकरिता सर्वात उत्तम आहे.
कन्या
आजचा दिवस संमिश्र आहे. नोकरी आणि व्यवसायात बोलण्यातील गोडव्यामुळे सन्मान मिळेल, ज्यामुळे मित्रांची संख्याही वाढेल. कुटुंबात एखाद्या शुभकार्यावर चर्चा होऊ शकते. वाहन चालवताना काळजी घ्या, अन्यथा अपघात होऊ शकतो. आई-वडीलांची सेवा करण्याची संधी मिळेल.
तुळ
आजचा दिवस उत्तम लाभदायक आहे. कामाशी संबंधीत सर्व मुद्दे मार्गी लागतील. व्यवसायातील काही नवीन प्रकल्पांवर काम सुरू करू शकता जे भविष्यात प्रचंड लाभ देतील. जमीन मालमत्तेसंबंधी प्रकरणात कुटुंबातील आणि आसपासचे लोक त्रास देण्याचा प्रयत्न करतील, परंतु निराश होऊ नका. संध्याकाळपर्यंत सर्व शत्रू शांत होतील. जोडीदारास कुठेतरी फिरायला नेऊ शकता.
वृश्चिक
आज व्यवसायात एक नवीन उत्साह येईल. आजचा दिवस व्यवसायाठी चांगला आहे. दिवसभर नफ्याच्या संधी येत राहतील, ज्यामुळे आनंद प्रचंड वाढेल. संध्याकाळी कुटुंबातील सदस्यांसह पार्टी करू शकता. नोकरी करणार्यांना धनलाभाचा मोठा योग आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेबद्दल चिंता वाटू शकते. रोजगाराशी संबंधीत जातकांना नवीन संधी मिळतील. मामाच्या बाजूकडून सन्मान मिळेल.
धनु
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. एखाद्या कुटुंबासाठी पैशांची व्यवस्था करावी लागू शकते. व्यवसायात सुवर्णसंधी मिळेल. परंतु ती ओळखणे तुमच्या हातात आहे. व्यवसायात जोखीम उचलल्यास त्यामध्ये मोठा फायदा होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आर्थिकस्थिती मजबूत होईल. वडिलांच्या आधाराची आवश्यकता असेल. संध्याकाळी मित्रांसह वेळ घालवाल.
मकर
आजचा दिवस अनेक सुवर्ण संधी घेऊन येईल. जर भागीदारीत व्यवसाय केला असेल तर मोठा फायदा होईल. संतती संबंधित एखादा मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. अनेक प्रकारची कामे हातात आल्याने लाभ सुद्धा जास्त होईल. जुनी रखडलेली कामे करण्यासाठी वेळ चांगली आहे. संध्याकाळी शेजार्यांशी वाद घालू नका.
कुंभ
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आरोग्याबाबत सावधगिरी बाळगा, कारण हवामान बदलामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, म्हणून सावधगिरी बाळगा आणि खाण्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. नोकरी आणि व्यवसायात घाई होईल, म्हणून सर्व कामे काळजीपूर्वक करा. संततीच्या भविष्याबद्दलची चिंता आज संपेल. प्रेमजीवन सुधारेल.
मीन
आजचा दिवस उत्तम लाभदायक आहे. आज व्यापारात ते सर्वकाही मिळवू शकता ज्याची आजपर्यंत उणीव होती. व्यवसायात एखादी जोखीम पत्करावी लागत असेल तर ती घ्या कारण फायदेशीर ठरेल. जर एखाद्या मालमत्तेत गुंतवणूक करायची असेल थोडे थांबणे उत्तम ठरेल. विद्यार्थी शिक्षकांकडून आपल्या समस्या सोडवून घेतील.