मेष
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कामावर लक्ष केंद्रित कराल जेणेकरून कामाची गती पुन्हा प्राप्त होईल, आणि फायदा होईल. आज स्वत: बद्दल एक विचित्र अभिमान वाटू शकतो, तो टाळणे चांगले. इतरांनाही महत्त्व द्या. समाजात लोकप्रियता वाढेल आणि आदर मिळेल. चांगले खाणे, नवीन कपडे खरेदी करण्याचा विचार करू शकता. प्रवासासाठी दिवस अनुकूल नाही. व्यवसायातील नवीन करारासाठी प्रयत्न कराल. प्रेमसंबंधासाठी दिवस सामान्य आहे. वैवाहिक जीवनात तणाव येऊ शकतो, कारण जोडीदाराशी वाद होऊ शकतो.
वृषभ
आजचा दिवस चांगला आहे. व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी काही पैसे खर्च कराल, ज्यामुळे व्यक्तिमत्व सुधारेल. लोकांना आपल्या बोलण्यातून आपलेसे कराल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीची तब्येत बिघडू शकते. व्यवसायात नफा होईल. कामात आजचा दिवस सामर्थ्य देईल.
मिथुन
आज सावधगिरी बाळगण्याचा दिवस असेल. आरोग्यामध्ये चढ-उतार राहील, म्हणून लक्ष द्या आणि निष्काळजीपणाने वागू नका. सूखाच्या मागे धावणे तुम्हाला आर्थिक आव्हानांमध्ये फसवू शकते. समाजात आपल्या इच्छाशक्तीमुळे एखादे काम करणे कौतुकास पात्र बनवेल. सामाजिक वर्तुळ वाढेल. प्रेमसंबंधासाठी दिनमान सामान्य आहे. विवाहिताना जोडीदाराकडून अशा गोष्टी समजतील, ज्यामुळे तुमचे नाते आणखी चांगले होईल. कामात यश मिळेल.
कर्क
आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबाबत खुप विचार कराल. व्यवसायात चांगला नफा मिळेल. मन आनंदित होईल, कारण उत्पन्न चांगले होईल. नोकरीत प्रयत्न यशस्वी होतील. चांगले परिणाम मिळतील. प्रमोशनची संधी मिळू शकते, पण गर्व करून कुणालाही वाईट बोलू नका. विरोधकांपासून सावध रहा. प्रेमसंबंधात रोमान्स राहील. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे आरोग्य बिघडल्याने त्रस्त व्हाल.
सिंह
आजचा दिवस मध्यम आहे. खर्चामध्ये वाढ होईल. पण ते आवश्यक असतील. मानसिक चिंता वाढतील. आरोग्यही कमजोर राहू शकते. काही कामात मन कमी लागेल पण भाग्याच्या बळावर अनेक कामे होतील. वडिलांचे सहकार्य मिळेल. कामात चांगला लाभ होईल. प्रेमसंबंधात त्रासदायक असू शकते. प्रिय व्यक्तीला भेटण्याचा प्रयत्न कराल, पण ही भेट सध्या शक्य होणार नाही. वैवाहिक जीवनात जोडीदारामुळे आलेला तणाव कमी होईल.
कन्या
आजचा दिवस चांगला आहे. संततीबाबत खूप विचार कराल आणि त्यांच्या भविष्यासाठी नवीन योजना तयार कराल किंवा नवीन योजनेत गुंतवणूक कराल. शिक्षणामध्ये अडथळे येतील. बँक कर्ज घेण्यात यश मिळू शकते. व्यवसायासाठी दिवस चांगला आहे. नोकरदार व्यक्तींनी बुद्धिमत्ता वापर करुन दिवस अधिक चांगला करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एखाद्या चांगल्या व्यक्तीची भेट होईल. आरोग्य चांगले राहील. उत्पन्न मजबूत होईल, ज्यामुळे आनंद होईल.
तुळ
आजचा दिवस सामान्य आहे. घरगुती खर्चाकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. कुटुंबाच्या जबाबदार्या समजून घ्याल आणि त्या पार पाडण्याचा प्रयत्न कराल. कुटुंबातील सदस्यांच्या मनातील जाणून कुटुंबात चांगला काळ आणण्याचा प्रयत्न कराल. वैवाहिक जीवनात तणाव असू शकतो. कामात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. नोकरीत कामगिरी कौतुकास्पद असेल. पण मानसिकदृष्ट्या खूप व्यस्त असाल, कामावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे ठरेल. आरोग्य कमजोर होऊ शकते. प्रेमसंबंधात प्रिय व्यकतीच्या घरच्यांना भेटू शकता.
वृश्चिक
आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबातील वातावरण चांगले राहील, परंतु एखाद्या लहान सदस्याचे आरोग्य बिघडू शकते. प्रेमसंबंधासाठी दिनमान चांगले आहे. परंतु प्रिय व्यक्ती एखादी गोष्ट ताणून धरेल, भांडणाचा मूड राहील. प्रवासासाठी दिवस अनुकूल नाही, प्रवास टाळा. वैवाहिक जीवनात रोमान्सची संधी मिळेल. नोकरीत चांगले परिणाम मिळतील. व्यवसाय आजही फायदेशीर ठरेल.
धनु
आजचा दिवस मध्यम फलदायक आहे. आरोग्याची काळजी घ्या. खाण्याकडे पूर्ण लक्ष द्या. मानसिक ताणतणावातून मुक्ती मिळेल. परंतु घशात दुखण्यामुळे किंवा खराब झाल्याने अस्वस्थ होऊ शकता. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. कामात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. वैवाहिक जीवन चांगले राहील. प्रेमसंबंधात तणाव राहील, म्हणून जास्त वरचढपणा बोलणे टाळा आणि त्यांच्यासाठी एक चांगली भेट आणा.
मकर
आजचा दिवस चांगला आहे. नवीन काम करण्याचा विचार कराल, आणि त्यासाठी रूपरेषा आखाल. कुटुंबातील वातावरण आनंददायी असेल. सरकारी क्षेत्रातून नफा होईल. प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करू शकता. वाहन खरेदी करण्याचीही स्थिती आहे. प्रेमसंबंधात प्रेम वाढेल. वैवाहिक जीवनात तणावातून मुक्ती मिळेल. चांगले परिणाम मिळतील. मेहनत दिसून येईल. तब्येत सुधारेल.
कुंभ
आजचा दिवस चांगला आहे. प्रवासासाठी विचार कराल, आणि कुठेतरी जाण्यासाठी कुटुंबाशी चर्चा कराल. उत्पन्न कमी होऊ शकते आणि खर्च वाढेल. मानसिक ताणही वाढेल, म्हणून सावधगिरी बाळगा. कुटुंबातील लोकांच्या चांगल्या वागण्याने घरात आनंद कायम राहील, म्हणून कुटुंबासमवेत थोडा वेळ घालवा. जोडीदाराकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते. प्रेमसंबंधासाठी प्रयत्न करण्याने प्रिय व्यक्तीचे मन जिंकण्यात यशस्वी व्हाल. एकत्रित जेवणाचा आनंद घ्याल.
मीन
आजचा दिवस चांगला आहे. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल आणि त्यात यशही मिळेल. जुन्या योजना वाढतील आणि त्याचा फायदा होईल. आज अनेक ठिकाणाहून पैसे परत येऊ शकतात. पैसे कुठे अडकले असतील तर परत येतील. कुटुंबात मान मिळेल. मित्र आणि नातेवाईकांशी बोलण्याने मन हलके होईल. नोकरीसाठी दिवस सामान्य आहे. व्यवसायात चांगले परिणाम मिळतील. प्रेमसंबंधात अडचणी येतील. प्रिय व्यक्तीशी इतरांबद्दल चर्चा करू नका. वैवाहिक जीवन आनंदी असेल.