लॉस एंजलिस : वृत्तसंस्था – हॉलीवुड स्टार चॅडविक बॉसमॅनचे शुक्रवारी निधन झाले. मार्व्हल स्टूडियोची फिल्म ‘ब्लॅक पँथर’ मध्ये मुख्य भूमिका साकारणारा चॅडविक 43 वर्षांचा होता आणि मागील 4 वर्षांपासून तो कॅन्सरने पीडित होता. न्यूज एजन्सी एपीनुसार, चॅडविकच्या प्रतिनिधीने त्याच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. चॅडविकचे निधन लॉस एंजलिसमध्ये त्याच्या घरी झाले.
4 वर्षांपासून कॅन्सरने पीडित
एपीच्या रिपोर्टनुसार, चॅडविकच्या प्रतिनिधीने सांगितले की, चॅडविकची पत्नी आणि कुटुंबिय अंतिम काळात त्याच्या सोबत होते. तो कोलोन कॅन्सर (आतड्यांचा कर्करोग) ने पीडित होता.
सुपरस्टार अॅक्टरच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांनी एक वक्तव्य जारी केले आहे, ज्यामध्ये त्यास एक खरा योद्धा म्हटले आहे. यामध्ये म्हटले आहे की, एक खरा योद्धा, चॅडविकने आपल्या संघर्षाद्वारे तुमच्या पर्यंत सर्व चित्रपट पोहचवले, ज्यास आपण खुप प्रेम दिले.
कुटुंबाने सांगितले की, चॅडविकने मागील चार वर्षात अनेक चित्रपटांचे शुटींग केले आणि हे सर्व त्याच्या अनेक सर्जरी आणि केमोथॅरेपीच्या दरम्यान होत होते. ब्लॅक पँथर फिल्ममध्ये सम्राट टी-चाला ची भूमिका करणे हा त्याचा सन्मान होता.
ब्लॅक पँथरने बनवले सुपरस्टार
चॅडविकने आपल्या करियरमध्ये ‘42’ आणि गेट ऑन अप सारख्या फिल्ममधून आपले नाव तयार केले आणि नंतर 2018मध्ये आलेली मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या फिल्ममध्ये ब्लॅक पँथरची भूमिका साकारून तो प्रेक्षकांमध्ये हिट झाला.
यांनतर त्याने एव्हेंजर्स-इन्फिनिटी वॉर आणि अव्हेंजर्स-अँड गेम सारख्या ब्लॉकबस्टर फिल्ममध्ये पुन्हा ब्लॅक पँथरची भूमिका केली होती. त्याची शेवटची फिल्म द 5 ब्लड्स याच वर्षी रिलिज झाली होती.