बहुजननामा ऑनलाइन टीम – Hodgkins Lymphoma | प्रौढांच्या तुलनेत मुलांमध्ये रोगाचे निदान करणे खूप कठीण असते. मुलांना त्यांच्या शरीरात होत असलेल्या बदलांची जाणीव नसते. असेच एक प्रकरण नुकतेच समोर आले आहे. एका महिलेने सांगितले की, तिच्या मुलाच्या त्वचेवर खूप खाज (Itching On The Skin) येत होती. यासाठी त्याला डॉक्टरांकडे नेले असता असा आजार समोर आला, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. संपूर्ण प्रकरण काय (Hodgkins Lymphoma) होते ते जाणून घेऊया-
एके दिवशी एका स्थानिक क्लबमध्ये फुटबॉल खेळत असताना रेयान थॉमसन (Ryan Thomson) खेळपट्टीवर खूप सुस्त दिसत होता. रेयानची आई ऑड्रे (Audrey Thomson ) यांना जाणवले की त्याच्याबाबतीत काही तरी चुकीचे होत आहे. परंतु जेव्हा रेयानच्या शरीरावर लक्षणे दिसू लागली तेव्हा तिला धक्का बसला. स्कॉटलंडमधील फाल्किर्क (Falkirk, Scotland) येथे राहणार्या रेयानचे वजन अचानक खूप कमी झाले.
यासोबतच त्याला खाज येण्याची समस्याही भेडसावत होती, हळूहळू ही खाज त्यांच्या शरीरभर पसरली. ऑड्रेला प्रथम वाटले की रेयानला अशा एखाद्या गोष्टीची अॅलर्जी (Allergy) असू शकते. यासाठी तिने कपडे धुण्याची डिटर्जंट पावडर (Detergent Powder) बदलली. असे करूनही रेयानच्या त्वचेच्या लक्षणांमध्ये कोणताही बदल झाला नाही आणि नंतर त्याच्या ग्रंथींमध्ये (लिम्फ नोड्स) सुद्धा सूज आली.
रेयानमध्ये हे लक्षण दिसल्यानंतर ऑड्रे यांनी त्याला तातडीने डॉक्टरांकडे नेले. जिथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली, त्यासोबतच रक्त तपासणी आणि स्कॅनही करण्यात आले. त्यानंतर रेयानला आणखी काही चाचण्यांसाठी ग्लासगो येथील क्विन एलिझाबेथ युनिव्हर्सिटी हॉस्पिटल (Queen Elizabeth University Hospital in Glasgow) मध्ये रुग्णवाहिकेतून नेण्यात आले. डॉक्टरांनी 54 वर्षीय ऑड्रे यांना सांगितले की काळजी करू नका कारण रेयानला कॅन्सर वॉर्डमध्ये नेले जात आहे.
बरोबर एक आठवड्यानंतर, रेयानला सांगण्यात आले की त्याला हॉजकिन्स लिम्फोमा (Hodgkins Lymphoma) नावाचा एक दुर्मिळ रक्त कर्करोग (Rare Type Of Blood Cancer) आहे. या आजाराने ग्रस्त असलेल्या तीनपैकी एकाला त्वचेवर खाज येते. याशिवाय, विनाकारण वजन कमी होणे, लिम्फ नोड्स सुजणे आणि रात्री घाम येणे ही देखील सामान्य लक्षणे आहेत. लिम्फोमाचे दोन मुख्य प्रकार आहेत – हॉजकिन लिम्फोमा आणि नॉन-हॉजकिन लिम्फोमा (Hodgkin Lymphoma And Non-Hodgkin Lymphoma).
लिम्फोमा अनेक विविध लक्षणे (Lymphoma Symptoms ) निर्माण करू शकतो. हे या गोष्टीवर अवलंबून आहे की, हा कोणत्या प्रकारचा लिम्फोमा आहे आणि तो शरीराच्या कोणत्या भागात विकसित होत आहे? ऑड्रेने सांगितले की, हा कॅन्सर (Cancer) रेयानच्या मानेत आणि छातीत सापडला असून तो दुसर्या टप्प्यात पोहोचला आहे.
डेली रेकॉर्डशी बोलताना ऑड्रेने सांगितले की, सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हा कॅन्सर फक्त दुसर्या टप्प्यात आहे. अशा स्थितीत रेयानला अजून केमोथेरपी किंवा रेडिओथेरपीची फारशी गरज नाही. त्याच्या कुटुंबाला आशा आहे की, ऑगस्टपर्यंत उपचार पूर्ण होतील आणि रेयान त्याच्या मित्रांसोबत बाहेर जाऊ शकेल.
ऑड्रे हॉजकिन (Audrey Thomson) लोकांना लिम्फोमाबद्दल जागरूक करत आहेत. ऑड्रे म्हणाल्या, वजन कमी होणे आणि त्वचेवर खाज येणे ही कॅन्सरची लक्षणे असू शकतात असे मला कधीच वाटले नव्हते. इतर पालकांनीही या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये अशी माझी इच्छा आहे.
ऑड्रे यांनी सांगितले की, रेयानचा आजार वेळेआधीच कळला होता, पण जर उशिराने माहिती मिळाली असती तर परिस्थिती वेगळी असू शकली असती. अशा स्थितीत तुम्ही तुमच्या मुलांना ओळखणे महत्त्वाचे आहे. तरुणपणी मुलांच्या त्रासांबद्दल जाणून घेणे खूप कठीण आहे, ते तुम्हाला काहीही सांगत नाहीत. पण मला समजत होते की, रेयानमध्ये काहीतरी चूकीचे होत आहे.
Web Title :- hodgkins lymphoma blood cancer 14 year old boy began to lose weight and itchy skin diagnosed with rare form of blood cancer
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Foods For Strong Bones | हाडे मजबूत करण्यासाठी सेवन करा ‘या’ 9 गोष्टी, वृद्धत्वात होणार नाही अडचण