नोएडा : मोबाइल आणि इतर वस्तूंद्वारे पसरणार्या कोरोनाच्या धोक्यापासून सुटका आता अवघ्या काही मिनिटात शक्य आहे. दिल्ली युनिव्हर्सिटीच्या प्रतिष्ठित हिंदू कॉलेजच्या भौतिकी विभागाचे असिस्टंट प्रोफेसर डॉक्टर ललित कुमार यांनी यासाठी एक मशीन तयार केली आहे. डॉक्टर ललित यांचा दावा आहे की, घरात वापरण्यासाठी ही मशीन अतिशय उपयोगी ठरेल. ही एक अशी मशीन आहे, ज्याद्वारे करन्सी नोट, ऑफिस फाईल, ग्रोसरी आयटम, फळे, भाज्या, चष्मा, मास्क, हेल्थकेयर प्रॉडक्ट्स, एटीएम कार्ड, पार्सल, मुलांची खेळणी आणि इतर वस्तूंना एका मिनिटात संसर्गरहित करता येऊ शकते.
ही मशीन 20 लीटर आणि 40 लीटरच्या क्षमतेमध्ये उपलब्ध आहे, जी घर, ऑफिस आणि शाळांमध्ये सहज वापरता येऊ शकते. या मशीनची किंमत अजून ठरवलेली नाही, परंतु डॉक्टर ललित यांच्यानुसार तिची किंमत 6,000 रुपयांपेक्षा कमी असेल. ही बाजारात उपलब्ध कोणत्याही अल्ट्रा वायलेट डिव्हाईसपेक्षा स्वस्त असेल.
डॉ. ललित यांच्यानुसार, ही मशीन एक टीमवर्कचा परिणाम आहे. ज्यामध्ये हिंदू कॉलेजच्या रसायन शास्त्र विभागाचे प्रोफेसर डॉक्टर रीना जैन, डॉक्टर अंजू श्रीवास्तव आणि आयआयटी दिल्लीचे अल्युमिनी डॉक्टर उपदेश वर्मा सुद्धा सहभागी आहेत. मशीनचे नाव युव्ही ओमेगा आहे. ही मशीन एक्सपोझरच्या एका मिनिटांच्या आत 99.9 टक्के बॅक्टेरिया आणि व्हायरसला निष्क्रिय करण्यासाठी सक्षम आहे.
या मशीनला आवश्यक मानकांनी म्हणजेच डीआरडीओच्या लास्टेक म्हणजे लेझर शास्त्र आणि तंत्रज्ञान विभागाने प्रमाणित केले आहे. या मशीनमध्ये 254 नॅनोमीटर वेबलेंग्थचे युव्ही-सी लॅम्प लावले आहेत, जे 360 डिग्रीचे एक्सपोझर देतात. सोबतच टायमर, सुरक्षा स्विच आणि अलार्म सुद्धा लावले आहेत.
कोविड-19 महामारीच्या या काळात हे मशीन मोबाइल आणि इतर सामानाद्वारे पसरणार्या संसर्गापासून सुटका देण्यासाठी उपयोगी ठरणार आहे.