पुणे : बहुजननामा ऑनलाईन – High Court | बाळाच्या हृदयाला छिद्र, मेंदूची अपुरी वाढ, डोक्याची आकाराची अवाजवी वाढ असे व्यंग असलेल्या दोन महिलांना गर्भांचा गर्भपात करण्यास उच्च न्यायालयाचे (High Court) मंजुरी दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
बाळात दोष असल्याचे लक्षात आल्याने त्यांचा गर्भपात करणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांचे नोंदविले होते. मात्र, गर्भपातास कायदेशीर अडचण निर्माण झाल्याने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने त्यांना कायदेशीर मदत केली. वीस आठवडे होऊन गेल्यानंतर जन्माला काही आठवड्याचा कालावधी राहिलेल्या दोन महिलांच्या गर्भावस्थेतच अनेक व्यंग असल्याचे वैद्यकीय चाचण्यांमध्ये लक्षात आले. त्यात दोन्हीही गर्भामध्ये पाठीच्या कण्यामध्ये व्यंग, हृदयाला असलेले छिद्र, मेंदूची अपुरी वाढ, डोक्याची आकाराची अवाजवी वाढ इत्यादी अनेक व्यंग होते. तसेच जन्मानंतरही बालकांवर शल्यचिकित्सेव्दारे देखिल सुधारणा होण्याची धूसर शक्यता असल्याने तातडीने गर्भपात करणे आवश्यक होते. त्यामुळे त्यांनी मदतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात धाव घेतली.
अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे (Dr. Muralidhar Tambe), डॉ. मानसिंग साबळे (Dr. Mansingh Sable), अधिक्षक डॉ. अजय तावरे (Dr. Ajay Taware), डॉ. स्वप्ना यादव (Dr. Swapna Yadav), प्रसूती शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. रमेश भोसले (Dr. Ramesh Bhosale) आणि कांबळे यांच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पडली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या कर्मचारी सायली थोरात यांनी याचिका दाखल करण्यासाठी सहकार्य केले.
ससूनमध्ये झाला गर्भपात
विवाहित दांपत्याला ताबडतोब मदतीचा हात दिला. प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश संजय ए. देशमुख आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रताप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई उच्च न्यायालयात दोन वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. वकील तेजस दंडे (Adv. Tejas Dande) आणि भरत गढवी (Adv. Bharat Gadhvi) यांनी दांपत्याची बाजू मांडली. सरकारपक्षातर्फे के. आर. कुलकर्णी (K.R. Kulkarni) यांनी बाजू मांडली. गर्भात व्यंग्य असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर उच्च न्यायालयाने मंजुरी दिल्यानंतर दोन्ही विवाहित महिलांचा पुण्यातील (Pune) ससून सर्वोपचार रूग्णालयात (sasoon hospital) गर्भपात करण्यात आला.
Web Title :- High Court | Women with fetal malformations were allowed to have abortions High Court Order Legal Aid by District Legal Services Authority
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Thackeray Government | पालकांना मोठा दिलासा ! शालेय शिक्षण शुल्कामध्ये कपातीचा सरकारी आदेश जारी
Pune Ganeshotsav | यंदाच्या गणेशोत्सवात पुण्यातील गणेश मंडळाचं झालं एकमत