बहुजननामा ऑनलाइन टीम – मसाले आपल्या जेवणाची चव तर(bay leaf) वाढवतातच, परंतु त्यांचे अनेक आरोग्यदायी फायदेदेखील आहेत. मसाल्याच्या पदार्थात तमालपत्राचा वापर आवर्जून केला जातो. पोटात गॅस होणं टाळता यावं, यासाठी जड पदार्थ बनवताना याचा वापर आवर्जून केला जातो. आज आपण तमालपत्राच्या फायद्यांबद्दल माहिती घेणार आहोत.
1) अपचनामुळं पोटात वायू साठून कळा येत असतील तर या पानांचं अर्धा चमचा चूर्ण गरम पाण्याबरोबर घ्यावं.
2) सर्दी खोकला, घशाच्या तक्रारी, तापाची कणकण यावरही तमालपत्राचा चहा करून प्यावा किंवा हे चूर्ण मधातून वाटावे.
3) तमालपत्राचा काढा (3-4 पानं आणि पेलाभर पाणी) मुखरोगांवरही फायदेशीर ठरतो.
4) हिरड्यांना येणारी सूज, तोंडात व गालाच्या आतील भागात येणारे फोड, दात आणि हिरडयांचं दुखणं यात या काढ्याच्या गुळण्या कराव्यात. काढा जमेल तेवढा वेळ तोंडात धरून ठेवावा. फायद्यासाठी दिवसातून 4-5 वेळा तरी हा प्रयोग करणं गरजेचं आहे.
टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.