बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेकांना लवकर जेवल्यानंतर किंवा कधी-कधी रात्री उशिरापर्यंत जागरण केल्याने भूक लागते. बहुतांश लोक भूक शांत करण्यासाठी काहीही खातात. त्यामुळे वजन वाढते. पण हे आरोग्यासाठी घातक असते.
पण अशा काही गोष्टी आहेत त्यांचे सेवन केल्याने आपल्या आरोग्यासाठी फायद्याच्या ठरू शकतील…तर आता जाणून घेऊया काय आहेत त्या फायदेशार गोष्टी…
छोलेची चटणी : छोल्याची चटणी प्रोटीनसाठी चांगला स्त्रोत आहे. मध्यरात्रीसाठी हे अत्यंत आरोग्यदायी स्नॅक्स आहे. ब्लड शुगरला नियंत्रित करते. त्याचबरोबर पोट बराचवेळ भरलेले राहते.
सोयाबीनच्या शेंगा : हिरव्या सोयाबीनच्या शेंगांमध्ये प्रोटीन जास्त तर कॅलरी कमी असते. एका कपात सोयाबीनच्या शेंगा उकळून त्यामध्ये मीठ, मिर्च, लाल शिमला मिर्ची आणि जीरा पावडर टाकून एक चवदार मिडनाईट स्नॅक्स तयार करता येऊ शकते.
पॉपकॉर्न : बिगरतेलाचे 3 कप पॉपकॉर्न मिडनाईट स्नॅक्स म्हणून चांगला ठरू पर्याय ठरू शकतो. पॉपकॉर्नमध्ये कॅलरीज् सर्वात कमी आणि फायबर सर्वात जास्त असते.
पिस्ता : पिस्तामध्ये प्रोटीन, फायबर आणि मेलाटोनिन असते. मूठभर पिस्तामध्ये 6.5 मिलीग्रॅम मेलाटोनिन असते. हे खाल्ल्याने झोप चांगली लागते आणि पोटही भरते.
मणुक्यांचाही फायदा : 10-12 बदाम, शेंगदाणे, काजू किंवा अक्रोड रात्रीची भूक भागविण्यासाठी उत्तम स्नॅक्स आहे. मनुक्यामध्ये प्रोटीन, फॅट्स आणि फायबर असते. त्यामुळे याचे सेवन केल्याने भूक लागत नाही.
लो फॅट मिल्क : दूधात ट्रिप्टोफेन नावाचा अमिनो ऍसिड असते. त्यामुळे मेलाटोनिन आणि सेरोटिनिन हार्मोन बनते. हेच हार्मोन तणाव दूर करण्याचे काम करते आणि झोप चांगली लागण्यासाठी मदत करते. दुधात मोठ्या प्रमाणात प्रोटीन असल्याने जास्त वेळापर्यंत पोट भरलेले ठेवते.
पीनट बटरसह सफरचंद खावे : मध्यरात्री भूक लागली असल्यास पीनट बटरसह सफरचंद खाल्ल्याने याचा मोठा फायदा होतो. पीनट बटरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि हेल्दी फॅट असते, त्यामुळे पोट भरते.
हर्बल टी : झोपण्यापूर्वी जर तुम्हाला भूक लागत असेल तर हर्बल टी घ्यावी. हर्बल टी हळद, दालचिनीसारख्या अनेक फ्लेवरमध्ये उपलब्ध असते. ज्यांना लवकर झोप येत नसेल तर अशांना याचा फायदा होऊ शकतो.