पुणे : बहुजननामा ऑनलाईन – मनुवाद्यांनी चोर दरवाजाने आरक्षण समाप्त केले. सर्व केंद्रीय विध्यापिठामध्ये प्राध्यापकाच्या भरतीमध्ये १३ पॉईंट रोस्टर लावल्यामुळे यावर प्रश्न उपस्थित केला कि, तीन लाख रिकाम्या जगावर बिगर आरक्षण भरती केली जाईल ? उच्च शिक्षणामध्ये एससी, एसटी, ओबीसी आरक्षण समाप्त केले. हा मुद्दा सर्व देशभर चर्चेत आहे. विद्यापीठातील विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षांनी याला विरोध केला आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने १३ पॉईंट रोस्टर प्रणालीच्या बाजूने निकाल दिला असतानाच, सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्याच पद्धतीचा निर्णय देऊन येथील एसी,एसटी, ओबीसी च्या विद्यापीठामधील प्रासानिक प्रतिनिधी तत्वावर एका प्रकारे बंधने आणली. त्यामुळे या निर्णयाचा सर्वच स्तरातुन विरोध होतो. त्यावर सरकारने त्वरित अद्यादेश काढून हा कायदा रद्द करून २०० पॉईंट रोष्टर प्रणाली सुरु करण्यात यावी यासाठी सर्व देशभर आंदोलने केली जात आहेत.
पुण्यात केंद्रीय शिक्षण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घरावर १३ पॉईंट रोष्टर धोरणाविरोधात हल्ला बोल मोर्चा काढण्यात येणार आहे. दिनांक १३ फेब्रुवारी २०१९ वेळ सकाळी ११ वाजता हेवन हॉटेल चौकातील निळ्या झेंड्याजवळ पौंड रोड ते नवनिकेतन सोसायटी, मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे आयोजित केला आहे. यामध्ये बहुजन समाज पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, ( ए ) आरपीआय (आय ) आरपीआय ( सेक्युलर ) भीम आर्मी, भिम छावा, राष्ट्रिय बंजारा परिषद, जनता संघर्ष दल , मुस्लिम मूलनिवासी संघ, दापसा, यामध्ये विध्यार्थी संघटना व राजकीय पक्षाचा सहभाग राहणार आहे.