बहुजननामा ऑनलाइन : गुजरातमध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. या प्रकरणात छोटा उदयपूरच्या पावी जैतपूर येथे मंगळवारी मुसळधार पावसामुळे नसवाडीजवळ अचानक पावसामुळे नदीची पातळी वाढली. यामुळे गढबोरियाड-काधा पुलावर एक वाहन पाण्यात अडकले.
नदीच्या तीव्र प्रवाहामुळे कार १०० मीटर पर्यंत पाण्यात वाहत गेली. कारमध्ये चार लोक अडकले होते. पुलाजवळील काही लोकांनी त्यानं सुखरूप बाहेर काढण्यास मदत केली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, नसवाडीत मुसळधार पाऊस झाल्यामुळे नदीचे पात्र तुडुंब भरले होते. ज्यामुळे कमी उंचीच्या पुलावर पाणी वाहू लागले.
दरम्यान, पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे एक कार नदीत अडकली. कारमधील लोक ओरडू लागले. त्याचा आवाज ऐकून लोकांनी घटनास्थळ गाठले आणि त्यांना जिवंत वाचवले. गाडीत अडकलेल्या लोकांना वाचवल्यानंतर थोड्याच वेळात कार पाण्यात वाहू लागली आणि चेकडॅम मध्ये अडकली. छोटा उदयपूर येथे गेले दोन दिवस सतत पाऊस पडत आहे. या कारणास्तव येथे अनेक नदी नाले तुडुंब भरले आहेत.