नोएडा वृत्तसंस्था – एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल अशी घटना नोएडामध्ये समोर आली आहे. वेळोवेळी कोर्टाच्या तारखेला हजर राहणारी महिला पोलीस चक्क गँगस्टरच्या प्रेमात पडली. त्यानंतर सुरजपूर येथील न्यायालयात सुरु झालेली ही प्रेमकथा लग्न करण्यापर्यंत पुढे गेली. गँगस्टरवर एका व्यापाऱ्याचा खून केल्याचा आऱोप आहे. तसेच त्याच्यावर आणखी डझनभर खुनाचे आणि दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. राहूल ठसराना असे गॅँगस्टरचे नाव आहे. तर पायल असे महिला पोलिसाचे नाव आहे, परंतु या लग्नानंतर आयजींनी दखल घेत याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
गँगस्टर राहूल ठसराना याच्यावर २०१४ साली मनमोहन गोयल या व्यापाऱ्याचा खून केल्याचा आरोप आहे. दोघांची भेट सुरजपूर येथील न्यायालयात झाली. पायल नावाची महिला कॉन्सटेबल तेथे तैनात होती. राहूल ठसराना याला न्यायालयात हजर करण्यात येत होते. त्यावेळी दोघांची भेट झाली. त्यानंतर दोघांमध्ये कधी प्रेमसंबंध जुळले याची कल्पना कोणालाच आली नाही. दोघेही नंतर एकमेकांच्या संपर्कात होते. राहूल कधी कारागृहात तर कधी बाहेर असायचा. पायल आणि राहूलच्या लग्नाचे फोटो गुरुवारी समोर आले. त्यानंतर मेरठ परिमंडळाचे आयजी यांनी याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानंतर पोलीस लाईनच्या आऱआई आणि अन्य पोलीस ठाण्यांच्या पोलिसांनी याप्रकरणी पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे महिला कॉन्सटेबलच्या कुटुंबाचा हा बनाव असल्याचीही चर्चा आहे. परंतु तिने काही महिन्यांपुर्वीच त्याच्याशी लग्न केले असल्याची शक्यता आहे.
राहूल ठसराना हा अनिल दुजाना टोळीचा सदस्य आहे. तो २००८ मध्ये गुन्हेगारीच्या दुनियेत आला. राहूल याने मनमोहन गोयल या व्यापाऱ्याचा खून केल्याप्रकऱणी ९ मे २०१४ रोजी अटक झाला होता. मे २०१६ मध्ये पुन्हा गावकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी तो पोलिसांच्या रडारवर होता. त्यावेळी त्याची आई ग्राम पंचायतीच्या सरपंचपदासाठी निवडणूकीत उभी होती. त्याने गावकऱ्यांना कुणी तिच्या विरोधात उभे राहिल्यास त्याला परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली होती. त्यावेळी पायल तीन चार दिवसांपुर्वी तेथे जात येत होती. परंतु लोकसभा निवडणूकीनंतर पुन्हा राहूल तेथे आला नाही. याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलीस महानिरीक्षकांनी दिले आहेत. चौकशीनंतर महिला पोलिसाने हिस्ट्रीशीटरसोबत लग्न केल्याचा दावा केला जात आहे. ती महिला जिल्ह्यात सध्या तैनात नाही. ती कुठली राहणारी आहे. आणि कुठे नोकरीला होती. याचा तपास सुरु असल्याची माहिती पोलीस अधिक्षक रणविजय सिंह यांनी दिली आहे.