शाळा-कॉलेज सुरू करण्यासाठी केंद्र सरकारनं जाहीर केल्या मार्गदर्शक सूचना, जाणून घ्या संपूर्ण प्लॅन

बहुजननामा ऑनलाइन टीम  –   गेल्या कित्येक महिन्यांपासून देशातील शाळा आणि महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्था बंद आहेत. त्या उघडण्यासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत. ऑनलाइन शिकण्यापासून ते शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थिती शारीरिक व्यवस्था यासंदर्भात विचार केला जात आहे. दरम्यान, गृह मंत्रालयाने (Ministry of Home Affairs, MHA) अनलॉक ५.० साठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. अनलॉक ५.० च्या या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार १५ ऑक्टोबरपासून देशभरातील शाळा क्रमवारीनुसार उघडल्या जातील. शाळा व महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय परिस्थितीचा अंदाज घेऊन शाळा किंवा महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाशी सल्लामसलत करून घेतला जाईल. विशेष म्हणजे शाळांमध्ये उपस्थिती अनिवार्य केली जाणार नाही.

महाविद्यालये देखील उघडता येतील

शिक्षण विभागातील उच्च शिक्षण विभागाला महाविद्यालये उघडण्याबाबत निर्णय घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल. ऑनलाईन लर्निंग शिक्षाणाला कॉलेज आणि शाळा दोन्हीसाठी प्राधान्य दिले जाईल.

ही अनलॉक ५.० मार्गदर्शक तत्त्वे आहेत

परिस्थिती पाहून १५ ऑक्टोबरपासून शाळा व कोचिंग केंद्रे क्रमवारी नुसार सुरू करता येतील.

ऑनलाईन शिक्षणाला परवानगी देण्यात येईल.

– मुलांना शारीरिकरित्या शाळेत जाण्यास भाग पाडले जाणार नाही. मुलांना शाळेत जाण्यासाठी पालकांची परवानगी घ्यावी लागेल.

– जर शाळा ऑनलाईन वर्ग घेत असतील आणि एखाद्या विद्यार्थ्याला शाळेत येण्याऐवजी ऑनलाइन वर्ग करायचे असेल तर शाळा त्याला परवानगी देईल.

– आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या एसओपीची तत्वे लाखस्त घेऊन राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश त्यांची स्वतःची मार्गदर्शक तत्त्वे तयार करू शकतात. पण त्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.

– कटेन्मेंट झोन क्षेत्रातील शाळा बंदच राहतील.