नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या वर्षीच दिल्ली सरकारने घरगुती विजेची गरज भागविण्यासाठी सौर पॅनेल बसविण्यास मान्यता दिली होती. सौरऊर्जेला चालना देण्याच्या दृष्टीने दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला होता. तसेच, सौर पॅनेल बसविण्यासाठी ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा खर्च उचलावा लागणार नाही याची काळजी सरकारने घेतली होती. हा खर्च सौर पॅनल बसवणारी कंपनी उचलणार आहे. यातूनच तुम्ही तुमचा व्यवसाय सुरु करू शकतात.
सरकारने ५० तरुणांना फ्री मध्ये प्रशिक्षण देणार असल्याचे सांगून त्यांना सूर्य मित्र बनवण्याचे लक्ष दिले आहे. 18 हजार तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे आणि ते सूर्यमित्र म्हणून काम करत आहेत. मिनिस्ट्री ऑफ न्यू एंड रिन्यूएबल एनर्जीने त्यांना प्रशिक्षण दिले आहे. नोकरीसह या व्यवसायात सामील होऊन आपण पैसे कमवू शकता.
काय आहे सूर्य मित्र कार्यक्रम ?
मिनिस्ट्री ऑफ न्यू एंड रिन्यूएबल एनर्जीच्या स्पॉसरशिप अंतर्गत सूर्य मित्र कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. नेशनल इंस्टीट्यूट ऑफ सोलर एनर्जीने हा कार्यक्रम सुरु केला आहे. याअंतर्गत संपूर्ण देशात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यानंतर अर्जदार स्किल डेवलपमेंट सेंटरवर अर्ज करू शकतात.
सूर्य मित्र बनन्यासाठी योग्यता
जर आपण दहावी पास असाल आणि इलेक्ट्रीशियन, वायरमन, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, फिटर, शीट मेटलमध्ये आयटीआय केले असेल तर तुम्ही पात्र आहात. आपले वय १८ वर्षांपेक्षा जास्त असल्यास आपण एनआयएसईने अधिकृत केलेल्या केंद्रावर अर्ज करू शकता. प्रशिक्षणार्थीची निवड करताना ग्रामीण भागातील, बेरोजगार, महिला किंवा एससी-एसटीमधील तरुणांना प्राधान्य दिले जाईल. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणांना अयोग्य मानून प्रवेश देण्यात येणार नाही.
६०० तास देण्यात येणार प्रशिक्षण
हा एक पूर्णपणे विनामूल्य निवासी प्रशिक्षण कार्यक्रम आहे, जिथे राहणे आणि खाणे देखील विनामूल्य असेल. हा ६०० तासांचा प्रशिक्षण कार्यक्रम आहे. प्रशिक्षणानंतर अर्जदारांचे मूल्यांकन देखील केले जाईल. शेवटी एनआयएसईकडून प्रमाणपत्र दिले जाईल.
नोकरीपासून व्यवसायापर्यंतची संधी
प्रशिक्षण घेतल्यानंतर तरुण स्वत: चा सौर व्यवसाय सुरू करू शकतात. तरुणांनी सोलर सिस्टिमचा मेंटेनन्स, ऑपरेशन आणि इंस्टॉलेशन याचे प्रशिक्षण देण्यात येईल. यामुळे प्रशिक्षित तरुणांना परदेशी सोलर कंपन्यांमध्ये नोकरी देखील मिळेल.
Visit : bahujannama.com