नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुमच्या गाडीवर जानेवारीपर्यंत फास्टॅग लावलेला नाही तर घाबरण्याची आवश्यकता नाही. सरकार आता दिलेली डेडलाइन पुढे वाढवू शकते. सरकारने अगोदर म्हटले होते की, 1 जानेवारी 2021 पासून सर्व जुन्या वाहनांसाठी फास्टॅग बंधनकारक करण्यात येईल. यापूर्वी एनएचएआयने सुद्धा म्हटले होते की, 1 जोनवारीपासून कॅशने टोल कलेक्शन पूर्णपणे बंद करणार. सरकार टॅक्स कलेक्शन पूर्णपणे (100 टक्के ) फास्टॅगद्वारे वसूल करणार आहे.
मनी कंट्रोलमध्ये प्रसिद्ध वृत्तानुसार, याची डेडलाइन एक महिन्यासाठी वाढवली जाऊ शकते. याचे कारण हे आहे की, अजूनही अनेक वाहन चालक कॅशमध्ये टोल टॅक्स देत आहेत. सध्याच्या स्थितीत फास्टॅगद्वारे कलेक्शन 75-78 टक्केच्या जवळपास आहे. टोल प्लाझावर कॅश बंद करण्यासाठी सरकारने दोन्ही बाजूला फास्टॅगसाठी दोन वेगळ्या लाइन केल्या आहेत. अशा स्थितीत जर कुणी विना फास्टॅग या लाइनमध्ये आल्यास त्यास नॉर्मल टोल फी पेक्षा डबल पेमेंट करावे लागते.
डिजिटल मोडला देत आहे प्रोत्साहन
सरकारने 1 जोनवारीपासून सर्व चारचाकी वाहने आणि मोठ्या वाहनांवर फास्टॅग अनिवार्य केल्यानंतर सरकार मागील काही महिन्यांपासून कॅशमध्ये ट्रांजक्शन कमी करण्यावर काम करत आहे. सरकारला अपेक्षा आहे की, मोटर वाहन कायदा अनिवार्य तरतूदींनुसार टोल चार्जचे पेमेंट करण्यासाठी डिजिटल मोडमध्ये जावे लागेल, कारण नियमांचे पालन न केल्यास दंड लागेल.
या ठिकाणांवरून खरेदी करा फास्टॅग
राष्ट्रीय महामार्ग टोल प्लाझा आणि भारतीय स्टेट बँक, आयसीआयसीआय, कोटक, एचडीएफसी, अॅक्सिस सारख्या 22 विविध बँकांमधून फास्टॅग स्टिकर खरेदी करता येतात. हे पेटीएम, अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सुद्धा उपलब्ध आहे. जर तुमचे बँक अकाऊंट फास्टॅगशी लिंक होत असेल, तर पैसे थेट खात्यातून कापले जातात आणि पेटीएम वॉलेट फास्टॅगशी लिंक असेल तर हे पैसे वॉलेटमधून भरले जातात.