बहुजननामा ऑनलाईन
गुगलच्या न्युज ॲपवर बातम्या देण्याकरिता निवडक माध्यम समूहांना गुगल कंपनीकडून येत्या ३ वर्षात १ अब्ज डॉलरचा मोबादला देण्यात येणार आहे. प्रसारमाध्यमांकडून प्रसारित केलेल्या माहितीचा गेली अनेक वर्ष गुगल सर्च इंजिनकडून अवैधरित्या उपयोग करण्यात आला असा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे गुगलकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रसारमाध्यमांकडून देण्यात आलेल्या बातम्यांचे ब्लर्ब गुगलच्या न्युज ॲप मध्ये दिसतील तसेच जे लेख वाचायला पैसे भरावे लागत होते ते आता फ्री मध्ये वाचायला मिळतील.
कोणकोणत्या कंपनीशी करार करणार
गूगलचे उपाध्यक्ष ब्रॅड बेंडर यांनी सांगितले कि, गूगलच्या न्यूज शोकेस प्रोग्रॅमसाठी ब्राझील, अर्जेंटिना, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन आदी देशांमधून २०० प्रसारमाध्यम समूहांकडून गुगल सोबत करार करण्यात आला. बातम्यांचे जाळे जसे वाढत जाईल तसे गुगल अजून प्रसार माध्यमांशी करार करेल.