बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना साथीच्या नंतर काही बँकांनी एटीएममधून कॉन्टॅक्टलेस रोख पैसे काढण्याची ऑफर दिली. परंतु ही सुविधा पूर्णपणे कॉन्टॅक्टलेस नव्हती. दरम्यान, मास्टरकार्डने आता पूर्णपणे कॉन्टॅक्टलेस रोख पैसे काढण्याची ऑफर देण्यासाठी एजीएस ट्रान्झॅक्ट टेक्नॉलॉजीजबरोबर भागीदारी केली आहे. एटीएम कार्डधारक आता एटीएमच्या स्क्रीन व बटनांना स्पर्श न करता पैसे काढू शकतील. त्यांना फक्त स्क्रीनवर एक क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल.
वास्तविक, एजीएस ट्रान्झॅक्ट टेक्नोलॉजीज नावाच्या कंपनीने एक नवीन सॉफ्टवेअर तयार केले आहे ज्याच्या मदतीने कोणतीही व्यक्ती एटीएम मशीनला स्पर्श न करता पैसे काढू शकते. एजीएसटीटीएलचे ग्रुप चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर महेश पटेल म्हणाले की, आम्ही पूर्णपणे कॉन्टॅक्टलेस तोडगा काढला आहे. मास्टरकार्ड नेटवर्क वापरणार्या बँका आपल्या ग्राहकांना याची अंमलबजावणी करण्यासाठी एजीएस ट्रान्झॅक्ट टेक्नॉलॉजीशी संपर्क साधू शकतात.
एटीएमला स्पर्श न करता असे काढा पैसे-
– यासाठी प्रथम स्मार्टफोनवर बँकेचा मोबाइल अॅप उघडा आणि क्यूआर कॅश पैसे काढण्याच्या पर्यायावर क्लिक करा.
– त्यानंतर, आपल्याला किती पैसे काढायचे आहेत ती रक्कम फोनवर टावा.
– नंतर एटीएम स्क्रीनवर दाखविलेला क्यूआर कोड स्कॅन करा.
– आता प्रोसीड बटणावर क्लिक करून कन्फर्म करा.
– आता आपला 4 अंकी पिन क्रमांक प्रविष्ट करा.
– तुम्हाला एटीएममधून रोकड मिळेल
पटेल म्हणाले की, कॉन्टॅक्टलेस विड्रॉल महामारीच्या काळातच मदत करते असे नाही तर एटीएममध्ये होणारी फसवणूक कमी करण्यासही मदत करेल. सुमारे अडीच वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही प्रथम तंत्रज्ञानावर काम करण्यास सुरवात केली तेव्हा मोबाइल अॅप्सद्वारे रोख रक्कम काढण्याचे मुख्य कारण एटीएमची फसवणूक कमी करणे होय.
बीओआयमध्ये सुरू झाले कॉन्टॅक्टलेस विड्रॉल –
एजीएस ट्रान्झॅक्ट टेक्नॉलॉजीजने प्रथम बँक ऑफ इंडिया (बीओआय) सोबत ही सुविधा सुरू केली, जी पूर्णपणे कॉन्टॅक्टलेस नव्हती. परंतु आता, बीओआयसाठी संपूर्णपणे कॉन्टॅक्टलेस विड्रॉल सुविधा प्रारंभ करण्यात आली आहे. पटेल म्हणाले, ‘आता आम्ही ती बँक स्तरावर सादर करीत आहोत, जे केवळ विशिष्ट बँक एटीएमवर काम करतात. याशिवाय हे कोणत्याही मास्टरकार्डवर उपलब्ध आहे जे कोणत्याही एटीएममध्ये वापरता येते.