बहुजननामा ऑनलाईन टीम – (NHAI Recruitment 2021) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (National Highways Authority) विभागात ४१ जागांसाठी भरती घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सिव्हील अभियंत्यांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी उपव्यवस्थापक या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
एकूण जागा आणि पद :
– उपव्यवस्थापक : ४१
वेतन :
– ३९ हजार १०० रुपये
शैक्षणिक पात्रता :
– मान्यता विद्यापीठ किंवा संस्थेतून सिव्हील अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली असावी. सिव्हील अभियांत्रिकी विषयातील GATE (Graduate Aptitude Test in Engineering) मध्ये गुण २०२१ च्या आधारे थेट उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. सिव्हिल अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी देखील अर्ज करू शकते.
वयाची अट :
– ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
– २८ मे २०२१
अर्जासाठी कागदाची पूर्तता :
– फोटो, स्वाक्षरी, १० वी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, सिव्हिल अभियांत्रिकीचे प्रमाणपत्र, गेट स्कोअर कार्ड. फॉर्म भरत असताना 1 MB पेक्षा कमी सर्व कागदपत्रे फक्त jpg, jpeg, png किंवा gif स्वरूपात अपलोड करणे आवश्यक.
अधिकृत वेबसाईट :
– ऑनलाईन अर्जाद्वारे http://vacancy.nhai.org/