नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या चार – पाच दिवसांपासून सोन्यांच्या भावात घसरण होत आहे. बुधवारी (दि. 24) सोन्याच्या किंमतीमध्ये 8000 रुपये प्रति 100 ग्रॅमची घसरण झाली आहे. अर्थात भारतात सोन्याचे दर 800 रुपये प्रति तोळाने कमी झाले आहेत. या घसरणीनंतर 22 कॅरेट सोन्याचे दर 43,000 रुपये प्रति तोळा आहेत. 24 कॅरेट सोन्याचे दर 44,000 रुपये प्रति तोळा आहेत. गुडरिटर्न वेबसाइटनुसार, सोन्याच्या किंमतीत 19 मार्चपासून सलग घसरण होत आहे.
देशातील महत्वाच्या शहरातील 22 कॅरेट सोन्याची किंमत
मुंबई: 43,000 रुपये प्रति तोळा, पुणे: 43,000 रु. दिल्ली: 44,050 रुपये, -चेन्नई: 42,280 रु. कोलकाता: 44,400 रु. बंगळुरू: 41,900 आणि हैदराबाद: 41,900 रुपये प्रति तोळा असा आहे.
देशातील महत्त्वाच्या शहरातील 24 कॅरेट सोन्याची किंमत
मुंबई: 44,000 रुपये प्रति तोळा, -पुणे: 44,000 रु. दिल्ली: 48,050 रु. चेन्नई: 46,120 रु. कोलकाता: 47,000 रु. बंगळुरू: 45,700 रु. हैदराबाद: 45,700 रु. तोळा असा आहे.
दरम्यान आज मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे भाव वधारलेले दिसले. येथे 0.4 टक्क्यांनी सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. या वाढीनंतर सोन्याचे दर 44,835 रुपये प्रति तोळा पर्यंत पोहचले आहेत. तर चांदीमध्ये देखील उसळी पाहायला मिळाली. 0.34 टक्क्याने चांदीच्या दरात वाढ होऊन दर 65,190 रुपये प्रति किलो झाले आहेत.