बहुजननामा ऑनलाईन – गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री जिनिलीया देशमुख (Genelia D’Souza) ही खूपच चर्चेत आहे. नुकताच रितेश देशमुख आणि जिनिलीया यांची प्रमुख भूमिका असलेला ‘वेड’ हा चित्रपट 30 डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. तब्बल 10 वर्षांनी जिनिलीयाने पुन्हा सिनेसृष्टीत पदार्पण केल्याने चाहते फारच आनंदीत होते. रितेशने या चित्रपटाचे दिग्दर्शन करत दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकले. पहिल्या दिवसापासूनच वेड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाल केली होती. त्यानंतर एका मुलाखतीमध्ये जेनेलियाने (Genelia D’Souza) सिनेसृष्टीतून ब्रेक घेण्याबद्दलचा खुलासा केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
जिनिलीया सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. नुकताच तिने एका मुलाखतीमध्ये सिनेसृष्टीतून 10 वर्ष ब्रेक घेण्यामागचे कारण सांगितले आहे. यावेळी बोलताना जिनिलीया म्हणाली, ” कारण मला माझ्यासाठी काहीतरी करायचे होते. मला माझे कुटुंब सुरू करायचे होते. यावेळी मला अभिनय आणि चित्रपटात काम करण्याचा पुरेसा आत्मविश्वास नव्हता आणि मी सिनेसृष्टीतून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. त्याचा मला आनंद आहे. माझ्या निर्णयाचा मला पूर्ण आदर वाटतो. मी माझ्या खऱ्या आयुष्यात गृहिणी, पत्नी आणि आईची भूमिका साकारली आहे. या गोष्टींमुळेच माझ्या व्यक्तिमत्त्वाला आकार मिळाला आहे”.
पुढे बोलताना जिनिलीया (Genelia D’Souza) म्हणाली “मी सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला यामुळे मी एक प्रोडक्शन हाऊस म्युझिक कंपनी आणि इतर उपक्रमांवर लक्ष देऊ शकले. या पैलूंचा विकास करू शकले.
यामुळे मी अभिनयाव्यतिरिक्त काहीतरी करू शकते याची मला खात्री पटली. पण या संपूर्ण काळात मला अभिनयाची
उणीव नक्कीच जाणवली आहे. जर आज रितेश नसला असता तर मी आणखीन ब्रेक घेतले असते.
त्यानेच मला सांगितले की तू आता तुझ्या कलाकुसरीचा आनंद घेण्यासाठी त्याकडे परत जाण्याची वेळ आली आहे
आणि मी आता सिनेसृष्टीत परतले आहे. मला आता कोणतेही प्रोजेक्ट निवडण्याची घाई नाहीये.
मला जे काही करायचं आहे त्यासाठी मी थांबायला तयार आहे”.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
वेड या चित्रपटाची निर्मिती जिनिलीया देशमुख यांनी केली, तर दिग्दर्शन रितेश देशमुख यांनी केले आहे.
या मराठी चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रात आपली छाप सोडली होती. जिनिलीयाचा हा पहिलाच मराठी चित्रपट होता.
चित्रपटातील तिच्या अभिनयाने तर प्रेक्षकांना वेड लावले होते. या चित्रपटात रितेश जेनेलिया सोबतच अभिनेते
अशोक सराफ, शुभंकर तावडे, जिया शंकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटात अभिनेता
सलमान खान हा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला आहे.
Web Title :- Genelia D’Souza | genelia deshmukh talk about why she took 10 year break from cinema industry said its because husband riteish deshmukh
हे देखील वाचा :
Pune Crime News | प्रेमसंबंध तोडल्याने तरुणीचा विनयभंग करुन आईला केली मारहाण