बहुजननामा ऑनलाइन टीम – राज्य दहशतवादविरोधी पथकाने बांगलादेशी नागरिकांना बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट (पारपत्र) मिळवून देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. याप्रकरणी ४ बांगलादेशी नागरिकांसह त्यांना मदत करणाऱ्या आठ जणांना अटक(Gang exposes fake passports) करण्यात आली आहे. दरम्यान, तपासामध्ये या टोळीने सात वर्षात तब्ब्ल ८५ बांगलादेशी नागरिकांना बनावट पासपोर्ट तयार करून दिल्याचे उघडकीस आले आहे.
अक्रम नूर नबी ओलाउद्दीन शेख (२८) मोहम्मद सोहेल अब्दुल सुभान शेख (३३), अब्दुलखैर समसुलहक शेख (४२), अबुल हाशम ऊर्फ अब्दुल काशम शेख (२६) अशा ४ बांगलादेशी नागरिकांसह त्यांना मदत करणाऱ्या रफिक रहमतुल्ला सय्यद (४२), इद्रिस मोहम्मद शेख, नितीन निकम आणि अविन केदारे त्यानंही अटक केली आहे. अक्रमकडे ३ मोबाइल, ७ बांगलादेशी सिमकार्ड, १८ भारतीय सिमकार्ड व विविध बँकांचे ८ एटीएम कार्ड तसेच कागदपत्रांसह ८ लाख ३० हजार ७३० रुपये सापडले. तर रफिक शेखकडे वेगवेगळ्या तीन पॅनकार्डसह वाहन चालक परवाना, डेबिट कार्ड, दोन मोबाइल फोन आणि ४४६ पासपोर्टधारकांचे अर्ज आणि अर्ज नोंदणी डायरी जप्त करण्यात केली.
अक्रम नूर नबी ओलाउद्दीन शेख या बांगलादेशी नागरिकाला २९ नोव्हेंंबर रोजी शिवडीतून अटक करण्यात आली. तो घुसखोरीच्या मार्गाने भारतात आला. येथे त्याच्या वास्तव्यासाठी वडाळ्यातील नूर नवी आणि मुंब्रा येथील रफिक शेख यांच्यामार्फत आधारकार्ड, पॅनकार्ड व भारतीय पासपोर्ट मिळाले. त्यानुसार शेख व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करत तपास सुरू केला. तपासादरम्यान रफिक रहमतुल्ला सय्यद याला मुंब्रा येथून अटक करण्यात आली. तो २०१३ पासून पासपोर्ट दलाल म्हणून काम करतो. त्याने आतापर्यंत ४४६ लोकांचे पासपोर्ट काढून दिले आहेत. यामध्ये ८५ बांगलादेशी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली.