बहुजननामा ऑनलाइन टीम – उत्तर प्रदेशातील अयोध्या रामलला ट्रस्ट बँकेच्या अकाऊंटमधून 6 लाख रुपये गायब झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी चौकशीनंतर(Ramallah Trust) पोलिसांना मोठे यश आले असून तपासात महाराष्ट्र कनेक्शन असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. मात्र, या गुन्ह्यातील मास्टरमाईंड अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत असल्याची माहिती आहेत. रामललांच्या बँक अकाऊंटमध्ये फेरफार करणारा मास्टरमाईंड मुळचा वाराणसी येथील राहणारा आहे. मात्र सध्या तो मुंबईत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
रामजन्मभुमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या बँक खात्यामधून 9 स्पटेंबर 2020 रोजी सहा लाख रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले होते. यासंबंधी ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी आयोध्या कोतवालीमध्ये तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पत्रकार परिषद घेऊन आयोध्याचे पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) दीपक कुमार यांनी रामलाला यांच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर झाल्याची माहिती दिली होती. या खात्याला त्यानंतर गोठवण्यात आले होते.
दीपक कुमार यांनी सांगितले की, ट्रस्टच्या खात्यात 9 लाख 86 हजार रुपये होते. खात्यातून पैसे काढण्यावर 6 लाखाची लिमिट लावण्यात आली होती. आरोपींनी पहिल्यांदा दोन लाख 50 हजार व दुसऱ्यांदा 6 लाख 50 हजार रुपये ट्रान्सफर केले. अटक केलेल्या आरोपींमध्ये प्रशांत महाबल शेट्टी (मुंबई), विमल लल्ला (ठाणे), शंकर सीताराम (मुंबई), संजय तेजराज (मुंबई) इत्यादींची नावे पुढे आली आहेत. या आरोपींचा मास्टरमाईंड अद्याप फरार असून त्याचा शोध सुरु आहे.
पोलिसांनी चारही आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर, त्यानी आपला गुन्हा कबुल केला आहे. त्यांना आता न्यायालयात उपस्थित केले जाणार आहे. याप्रकरणात कोणी बँक कर्मचाऱ्याचा समावेश आहे का ? याचा तापास केला जात आहे.