नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकीकडे कोरोना संसर्गापासून बचावासाठी देशात लसीकरणावर (Vaccination) जोर दिला जात आहे, तर बनवाट व्हॅक्सीन (Fake Vaccine) प्रकरणे सुद्धा येत आहेत. एका पाठापोठ एक अनेक राज्यांतून बातम्या आल्या, ज्यामध्ये बनावट व्हॅक्सीन देत असलेल्या रॅकेटचा भंडाफोड झाला. बनावट व्हॅक्सीनने अनेक लोक आजारी झाले तर काहीजण पुढे कोणता परिणाम होणार म्हणून घाबरले आहेत. परंतु काही सोप्या पद्धतीने बनावट व्हॅक्सीनपासून वाचता येऊ शकते.
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
जर एखाद्या सोसायटी किंवा कॉलनी आपल्या परिसरात वैयक्तिक कॅम्प लावण्याचा विचार करत असेल तर रेसिडेंट वेल्फेयर असोसिएशनला स्थानिक अधिकार्यांसह पोलिसांना याची माहिती दिली पाहिजे. जोपर्यंत त्यांच्याकडून सहमती मिळत नाही तोपर्यंत पुढे जाऊ नये. यातून सर्व पडताळणी झाली पाहिजे.
ठथअ किंवा कॉर्पोरेट कंपन्यांनी स्वताच पुढे येऊन हॉस्पिटलसोबत करार केला पाहिजे की, त्यांनी त्यांच्या क्षेत्रात व्हॅक्सीनेशन कॅम्प लावावे. यात जर एखादे रॅकेट बनावट व्हॅक्सीन देण्याचा प्रयत्न करत असेल तर खासगी हॉस्पिटलमधूनच माहिती मिळेल की, त्यांच्यासोबत यांचा कोणताही संबंध नाही.
व्हॅक्सीन घेण्याचा विचार करत असलेल्या लोकांनी कोविन पोर्टलवर आपले रजिस्ट्रेशन केले पाहिजे.
सोबतच अशा कोणत्याही सेंटरवर जाऊ नका, जे कोविन सेंटरवर रजिस्टर नसेल.
याशिवाय व्हॅक्सीन घेतल्यानंतर लोकांच्या सेंटरवर आपल्या व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेटची मागणी केली पाहिजे.
जर कुणी सर्टिफिकेट देण्यात दुर्लक्ष केले किंवा उशीर केला तर संशयीत असू शकते.
म्हणजे बनावट व्हॅक्सीन असू शकते.
जर एखाद्या सेंटरवरून व्हॅक्सीन घेतलेल्या व्यक्तीत पोस्ट-व्हॅक्सीन सारख्या समस्या न दिसल्यास ते फेक व्हॅक्सीन सेंटर असू शकते. ते संशयीत असल्याची माहिती प्रशासनाला द्या.
Web Title :- Fake Vaccine | how to check fake coronavirus vaccination centre precautions
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
Actor Ujjwal |अभिनेता उज्वल धनगरचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; मराठी कलाविश्वावर शोककळा