रत्नागिरी : बहुजननामा ऑनलाईन – जनतेला सायबर फसवणुकीपासून जागृती करणार्या जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनाच त्यांच्या नावाने बनावट फेसबुकवर बनावट अकाऊंट काढले असल्याचा अनुभव आला आहे. फेसबुकवर बनावट अकाऊंट उघडून त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर फसवणुक, बदनामी व ब्लॉकमेल करण्याचा प्रयत्न होत असतो.
अनेक शासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी यांना यापूर्वी हा अनुभव आला आहे. अशा बनावट फेसबुक अकाऊंटवरुन त्यांच्या संबंधितांकडून पैसे उकळण्याचा प्रकार यापूर्वी समोर आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनाही त्याचा फटका बसला आहे.
त्यांच्या नावाने कोणीतरी फेसबुक अकाऊंट उघडल्याचे उघड झाले आहे. आपल्या नावाने जर रिक्वेस्ट आली तर ती कोणीही स्वीकारु नये, असे आवाहन डॉ. गर्ग यांनी केले आहे. नागरिकांनी सोशल मिडियाचा वापर करताना खबरदारी घ्यावी. काही गैरप्रकार आढळला तर रत्नागिरी सायबर सेलशी संपर्क साधावा, असे डॉ. गर्ग यांनी आवाहन केले आहे.