बहुजननामा ऑनलाईन टीम : टीव्हीची क्वीन प्रोड्युसर एकता कपूर (Ekta Kapoor) मालिका आणि सिनेमांमुळं कायमच चर्चेत असते. तिची खासगी लाईफ कधीच जास्त चर्चेत येताना दिसत नाही. परंतु आता मात्र हा ट्रेंड तुटताना दिसत आहे.
अनेक दिवसांपासून असा अंदाज लावला जात आहे की, एकता कपूर लवकरच तिचा जवळचा मित्रा तनवीर बुकवाला सोबत लग्न करणार आहे. याबद्दल एकता कडून अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही. परंतु ज्या अंदाजात तिनं तनवीर सोबतचा फोटो शेअर केला आहे तो पाहून तर चाहते असंच म्हणत आहेत की, एकता लग्न करणार आहे.
एकतानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती तनवीर सोबत दिसत आहे. फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शनमध्ये ती लिहिते की, आम्ही तिथे आहोत. सर्वांना लवकरच सांगू.
एकताची हा फोटो आणि कॅप्शन पाहून आता चाहते तिच्या लग्नाबद्दल बोलू लागले आहेत. सध्या तिचा फोटो सोशलवर तुफान व्हायरल होत असून ट्रेंड करतानाही दिसला होता.
तनवीरनं देखील अनेक फोटो शेअर केले आहेत. त्यानंही कमेंट करत म्हटलं आहे की, या दोस्तीला नात्यात बदलण्याची वेळ आली आहे.
आता तनवीरची कमेंट पाहिल्यानंतर मात्र चाहते आणखीच आतुर झाले आहेत. सर्वांना वाटत आहे की, लवकरच ती तनवीर सोबतच्या नात्यावरील मौन सोडेल आणि काहीरी गुडन्यूज देईल.