Ekta Kapoor | चाळीशी पार केल्यानंतरही एकता कपूरनं केलं नाही लग्न; म्हणाली – ‘वडिलांच्या एका अटीमुळे…’

Ekta Kapoor | producer ekta kapoor did not marry because of her father jeetendra read details

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Ekta Kapoor | बॉलिवूड क्षेत्रातील सुप्रसिद्ध निर्माती एकता कपूरचा (Ekta Kapoor) 7 जून रोजी 46 वा जन्मदिवस होता. एकता कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र (Actor Jitendra) यांची मुलगी आहे. कसौटी जिंदगी की, कहानी घर घर की, क्योंकि सांस भी कभी बहू थी, नागिन यासारख्या अनेक मालिकांची निर्मिती एकता कपूर हिनं केली आहे. त्यामधून ती अधिक चर्चेत आली.

चित्रपट सृष्टीत (Film Creation) अनेक कलाकारांनी चाळीशी पार केली आहे. मात्र, तरीही ते अविवाहित आहेत. त्यामध्ये एकता कपूरचाही (Ekta Kapoor) समावेश होतो आहे. एका मुलाखतीमध्ये (Interviews) एकताने अद्याप लग्न का केलं नाही, याबाबत खुलासा केला आहे. लग्नाच्या बाबतीमध्ये एकता सलमान खानच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याचे म्हटले तर वावगं ठरू शकणार नाही.

“वडिलांच्या एका अटीमुळे मला लग्न करता आलेलं नाही.” वडिलांनी मला सांगितंल की, ‘एकतर लग्न कर किंवा काम कर. मी कामाला निवडले.’ एकतानं पुढं असं देखील सांगितलं की, तिला लग्नच करायचं नसल्यानं तिनं कामाला प्राधान्य दिलं. लग्नापुढे एकतानं करिअरची निवड केली आहे. मन लावून समर्पकतेनं काम केलं. जिद्दीच्या बळावर ती हिंदी कलाविश्वातील आघाडीची निर्माती ठरली आहे. आपल्याला विचारही करता येणार नाही, इतका मोठा निर्णय तिने घेतला आहे.

Web Title :- Ekta Kapoor | producer ekta kapoor did not marry because of her father jeetendra read details

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update